राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाचे घवघवीत यश; साहिल आग्रे प्रथम

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाचे घवघवीत यश; साहिल आग्रे प्रथम

तळवली (मंगेश जाधव) –

हुंडाविरोधी चळवळ, मुंबई या सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध व वक्तृत्व स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या स्पर्धेत पाटपन्हाळे महाविद्यालयातील तृतीय वर्ष कला शाखेचा विद्यार्थी साहिल दिलीप आग्रे याने ‘भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व’ या विषयावर सादर केलेला निबंध सर्वोत्कृष्ट ठरवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

 

हुंडाविरोधी चळवळ ही संस्था गेल्या ५३ वर्षांपासून हुंडा प्रथेविरोधात विविध जनजागृती उपक्रम राबवत आहे. २६ नोव्हेंबर १९९२ पासून दरवर्षी ‘हुंडाविरोधी दिवस’ साजरा करण्यात येतो. त्यानंतर १० डिसेंबर ‘मानवाधिकार दिना’पर्यंत युवकांसाठी विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सन २००५ पासून महाराष्ट्र शासनानेही या उपक्रमास शासकीय पाठिंबा दिला आहे. यंदा या उपक्रमाचे ३७ वे वर्ष असून भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त स्पर्धांचे विषय संविधान, समानता व अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित ठेवण्यात आले होते.

 

या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील ८६ महाविद्यालयांमधून एकूण २५६ निबंध प्राप्त झाले. स्पर्धेतील विषय पुढीलप्रमाणे होते –

१) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे महत्त्व

२) हुंडा रूढीच्या निर्मूलनासाठी विद्यमान कायद्यांची निष्प्रभता

३) भारतीय संविधानातील समानतेचे मूलतत्त्व हुंड्याची रूढी कशाप्रकारे विफल करते?

 

पाटपन्हाळे महाविद्यालयातील द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची कु. नेत्रा प्रसाद पाध्ये हिनेही गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून महाविद्यालयाला श्री रोशनलाल तलवार ट्रॉफी जाहीर झाली आहे. विषय क्रमांक २ व ३ साठी अनुक्रमे सायन (मुंबई) येथील के. जे. सोमय्या नर्सिंग महाविद्यालयाची अर्पिता खोंड आणि कोडोली (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथील वासंतीदेवी पाटील फार्मसी महाविद्यालयाची कन्याकुमारी चिपकर यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.

 

साहिल आग्रे व नेत्रा पाध्ये या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच साहिल आग्रे याने नुकत्याच एस. बी. कला व वाणिज्य महाविद्यालय, शहापूर (जि. ठाणे) येथे आयोजित कै. सोनुभाऊ बसवंत स्मृतिप्रित्यर्थ राष्ट्रीय निबंध स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळवून ट्रॉफी, प्रमाणपत्र व रु. १५००/- रोख बक्षीसही प्राप्त केले आहे.

 

या यशाबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक, पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद देसाई यांनी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता साठ्ये महाविद्यालय सभागृह, विले पार्ले (पूर्व), मुंबई येथे होणार असून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाचे माजी अध्यक्ष श्री. संजय मंगला गोपाळ यांच्या शुभहस्ते पार पडणार असल्याची माहिती हुंडाविरोधी चळवळीच्या वतीने देण्यात आली आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात