विरोधी पक्षाच्या प्रतोदांचा मंत्रीपदाचा दर्जा काढून घेतला आता प्रतोदांसाठीही १० टक्के संख्याबळाची अट

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विरोधी पक्षाच्या प्रतोदांचा मंत्रीपदाचा दर्जा काढून घेतला

आता प्रतोदांसाठीही १० टक्के संख्याबळाची अट

मुंबई | प्रतिनिधी

दहा टक्के सदस्यसंख्येचा निकष लावत विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत्याची पदे रिक्त ठेवणाऱ्या सत्ताधारी महायुती सरकारने आता विरोधी पक्षाच्या प्रतोदांना मिळणारा मंत्रीपदाचा दर्जा व संबंधित सुविधाही काढून घेतल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून विरोधी पक्षाची पद्धतशीर कोंडी केली जात असल्याचा आरोप केला जात आहे.

राज्याच्या संसदीय कार्य विभागाने नुकताच एक शासन निर्णय (GR) जारी करून असा नियम लागू केला आहे की, सत्ताधारी पक्षांव्यतिरिक्त ज्या पक्षांकडे विधानसभा किंवा विधान परिषदेत एकूण सदस्यसंख्येच्या किमान १० टक्के सदस्य असतील, त्यांनाच प्रतोद व मुख्य प्रतोदांना मंत्रीपदाचा दर्जा आणि इतर शासकीय सुविधा मिळतील. निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत हा निर्णय घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

राज्यात नोव्हेंबर २०२४ मध्ये पंधरावी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतरही विधानसभेत अद्याप विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती झालेली नाही. महाविकास आघाडीकडे १० टक्के आमदारसंख्या नसल्याचे कारण पुढे करून सत्ताधाऱ्यांनी ही मागणी फेटाळली आहे. तसेच, मागील ऑगस्टमध्ये अंबादास दानवे यांची मुदत संपल्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही रिक्त आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेतील काँग्रेसचे संख्याबळ आणखी घटले आहे.

या पार्श्वभूमीवर आता मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांच्या दर्जा व सुविधांबाबतही नवा निर्णय लागू करण्यात आला आहे. विधानसभा व विधान परिषदेत प्रत्येक पक्षाचा एक मुख्य प्रतोद व एक प्रतोद असतो. २०१७ साली मुख्य प्रतोदांना कॅबिनेट मंत्री दर्जा आणि प्रतोदांना राज्यमंत्री दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मुख्य प्रतोदांना दरमहा २५ हजार, तर प्रतोदांना २० हजार रुपये मानधन, मुंबई अधिवेशनासाठी अनुक्रमे २५ हजार व २० हजार रुपये वाहन भत्ता, तसेच नागपूर अधिवेशनात वाहन सुविधा दिली जात होती.

मात्र आता विरोधी पक्षांपैकी कोणत्याही पक्षाकडे विधानसभा किंवा विधान परिषदेत १० टक्के संख्याबळ नसल्याने त्यांच्या प्रतोदांना या सर्व सुविधा मिळणार नाहीत. यामुळे विरोधी पक्ष अधिक दुर्बल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव असल्याची टीका केली जात आहे.


प्रतोदांची प्रमुख जबाबदारी

  • विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना पक्षादेश (व्हिप) जारी करणे
  • विधिमंडळ पक्ष व राजकीय पक्ष यांच्यात दुवा साधणे
  • पक्षाची राजकीय भूमिका आमदारांपर्यंत पोहोचवणे

 

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात