भिमाकाठचा ढाण्या वाघ गणपतराव राजेशिर्के यांचे १६ जानेवारी रोजी प्रथम पुण्यस्मरण ;

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

भिमाकाठचा ढाण्या वाघ गणपतराव राजेशिर्के यांचे १६ जानेवारी रोजी प्रथम पुण्यस्मरण ;

पुण्यस्मरणा निमित्त ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांचे किर्तन ;

अहिल्यानगर ( प्रतिनिधि ): श्रीगोंदा तालुक्या मधील भिमाकाठ परिसरातील ऐतिहासिक पेडगांव किल्ले धर्मवीरगड (बहादुरगड) येथील रहिवाशी व राजेशिर्के घराण्यातील एक अष्टपैलू धाडसी व्यक्तिमत्व माजी चेअरमन तथा “भिमाकाठचा ढाण्या वाघ” पैलवान गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांचे गेल्या वर्षभरापूर्वी २६ जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांचा ” प्रथम पुण्यस्मरण ” कार्यक्रम शुक्रवार दि. १६ जानेवारी रोजी आयोजन होणार असुन , त्यानिमित्त प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राजेशिर्के घराण्याने केले आहे.

कै. गणपतराव राजे शिर्के यांनी सन १९६५ ते १९७० च्या दशकात वयाच्या अवघ्या १८ ते २० व्या वर्षी कुस्ती क्षेत्रात मोठा नावलौकिक मिळवत, त्या दरम्यानच्या काळात श्रीगोंदा तालुक्यासह विशेषतः भिमाकाठ पट्टा परिसरातील लहाना थोरांच्या हृदयात जागा मिळवत. त्यावेळच्या तुलनेत सर्वात कमी वयात कुस्ती करता करता सामाजिक कार्याबरोबरच राजकारणात प्रवेश करुन भिमानदी काठाचा व किल्ले धर्मवीरगडासाठी (बहादुरगड) प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मौजे पेडगांवचा स्वच्छ पारदर्शी कारभार सांभाळणारे धडाडीचे घरंदाज व्यक्तिमत्त्व होते. ते चेअरमन तथा भाऊ नावाने सर्वांना परिचित असले तरी त्यांचे अलौकिक असे धाडस व समाजकार्य पाहता त्यांना “भिमाकाठचा ढाण्या वाघ” हीच उपाधी शोभून दिसते असे मत भीमा नदी पट्ट्यातील लोकांचे आहे.

चेअरमन राजेशिर्के यांनी त्यांच्या हयातीत ८० वर्षाच्या संघर्षमय जीवन काळात लाल मातीतल्या कुस्तीच्या आखाड्यात कधी पाठ न टेकवलेले नामवंत पैलवान म्हणून तर राजकीय निवडणुकांच्या मैदानातही कायम विजयाचा गुलाल घेणारे म्हणून त्यांना ओळखले जायचे, तालुक्याच्या राजकारणातही त्यांनी मान सन्मान मिळवत श्रीगोंदा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पद व शेतकऱ्यांची कामधेनु असलेल्या पेडगाव सोसायटीवर सलग तीस वर्ष चेअरमन पद भुषविलेले, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत राजकारणात सक्रिय राहून संचालक पदावर विराजमान असलेले, गोर-गरिबांचे कैवारी, अन्याया विरोधात वाचा फोडणारे व्यक्तिमत्व होते. शृंगारपुरकर तथा सातारकर म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत कै. तुकाराम राजे शिर्के यांचे ते पाच भावंडांपैकी धाकले सुपुत्र होते. ऐतिहासिक श्रीमंत पिलाजीराजे शिर्के घराण्याचे (महाराणी येसुबाईंचे ) वंशज असल्याने ते सर्वांचे प्रेरणास्थान ठरले होते. पैलवान कै. गणपतराव तुकाराम राजे शिर्के यांच्या कार्याचा कायम आदरयुक्त दबदबा होता. त्यांच्या जीवनावर रॉबिन हुड स्टोरी कादंबरी अथवा चित्रपट निघेल एवढं कार्य असल्याचे लोकांमधून बोलले जात असते.

आज मितिस पंजोबा हरिराजे शिर्के, आजोबा तुकारामजी राजे शिर्के, वडिल गणपतराव राजे शिर्के यांच्या मागे वंशपरंपरे प्रमाणे राजकीय, सामाजिक वारसा जपण्याचा प्रयत्न त्यांची मुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के, आं.स्वा.मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख, गडदुर्ग संवर्धक, इतिहास अभ्यासक, पत्रकार लक्ष्मीकांत राजे शिर्के, सतिश राजे शिर्के यांच्यासह नातवंडे, पुतणे करताना दिसत आहेत.
“भिमाकाठच्या ढाण्या वाघास” अर्थात कै. पै. चेअरमन गणपतराव राजे शिर्के उर्फ भाऊंना भावपूर्ण आदरांजली..विनम्र अभिवादन..! 🙏💐

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात