इराणमध्ये अराजक; २ हजारांहून अधिक मृत्यूची सरकारी कबुली
तेहरान :
इराणमध्ये सुरू असलेल्या देशव्यापी निदर्शनांत सुरक्षा कर्मचाऱ्यांसह २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची कबुली इराणी सरकारने पहिल्यांदाच दिली आहे. मृतांमध्ये नागरिक आणि सुरक्षा दलांचे प्रमाण स्पष्ट केलेले नाही.
महागाई, आर्थिक डबघाई आणि सत्तेविरोधी असंतोषामुळे परिस्थिती चिघळली असून, सरकारने या हिंसाचारासाठी दहशतवादी घटकांना जबाबदार धरले आहे. तसेच इराणमधील अशांततेमागे अमेरिका आणि इस्रायलचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
दरम्यान, इंटरनेट बंदीमुळे देशातील खरी परिस्थिती समोर येण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.
















