गणपती बाप्पा मोरया!… अनंत चतुर्दशी -२०२४

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मंगळवार, १७ सप्टेंबर २०२४`

*

मोरया मोरया

!!*

हे महागणपतेश्वरा…*”दहा दिवसाच्या परममंगल सहवासानंतर, हे सूर्यकोटीसमप्रभा, तुला निरोप द्यायचा आहे. आज तुझ्या मूर्तीचं विसुर्जन पाण्यात होणार आहे. डोळ्यात पाणी उभं आहे.

*हे अमृतमय अनंता,* किती वेडा मी! आदिरूपाला अंत नसतो, तो अनंत असतो, हे म्हणत म्हणत, दु:खी होण्याचं दु:ख मी कशाला डोळ्यावाटे पाझरतो आहे? ‘विसर्जन’ म्हणजे ‘विशेष सर्जन’. तुझी मंगलमूर्ती आज डोळ्यापुढून जाईल, पण ह्रदयातून कशी जाईल? तिचं नव्यानं सर्जन होईल. विशेष सर्जन होईल.

*हे विशालोदर वक्रतुंडा!* तुझ्या विसर्जन दिवसाला वाकडं तोंड करण्याचे मला कारण काय? तुझं वाकडं तोंड झालं आहे, हे निश्चयमूर्तीचं प्रतीक कसं दिसावं, त्यांचा आदर्श म्हणून. मान तुटेल, पण तुटणार नाही, असा निश्चयाचं तुझं वंदनीय प्रतीक.

*हे मोरेश्वरा!* मोरासारख्या सौंदर्यमूर्तीनं तुला ईश्वरत्व दिलं, मूषकासारख्या पिटुकल्या जीवाला तुझ्या विशालोदर देहाला आसनासाठी वाहनरूप होताना चिंता वाटली नाही. भक्तीचा भार निष्ठेनं घेणार्‍यांची चिंता तू वाहतोस, हे उंदरासारख्या क्षुद्र प्राण्यालाही माहीत आहे. मी त्यात मागे कसा राहीन?

*हे उपकारेश्वर एकदंता!* दुष्टाच्या शासनासाठी स्वत:चा एक दातसुद्धा तू तोडून दिलास. अनेक असूरांची पापं रक्तात बुडवण्याच्या सवयीनंच तुला रक्तवर्ण प्रिय राहिला. “निर्भय मनानं रक्त पाहण्याची सवय राखणारं राष्ट्र आणि त्यातले गण महान होतात.” हा तुझा संदेश अनंतकाळासाठी आहे. आज त्याची पुन्हा आठवण काढतो.

*हे मूलाधार गणराया!* तुझा जन्म दहा दिवसापूर्वी साजरा केला. ते जसं प्रतीक, तसंच आज तुझा विसर्जन दिन आहे, हेही प्रतीकच आहे. ‘येण्यानं सुख, जाण्यानं दु:ख’, हा दुबळेपणा मी लावून घेतला आहे, तू मला चिकटवला नाहीस. हे समजतं; पण हे उमानंदना, उमजत मात्र नाही.

*हे महाकाय महामंडलेश्वरा!* आज तुझी मूर्ती विसर्जित होवो. पण तुझ्या त्रिगुणातीत गुणांचं सर्जन माझ्या चेतनाच्या कणाकणात स्पंदित राहो. तुझी मृत्तिकाकार मूर्ती, मी आपोदेवतेत बोळवणार आहे. पण ‘पुढल्या वर्षी लवकर या’ म्हणत, बोळवणार आहे. म्हणून माझे ‘बोळवणे’, म्हणजे ‘बोलवणे.’

*हे अंताचा अंत करणार्‍या अनंतेश्वरा!* तुझ्या कर्तव्यकराल अलंकाराचा आदर्श सुवर्णस्पर्श, पुढल्या वर्षाधारेपर्यंत मी मनात आणि वर्तनात वागवीन. पुन्हा एकदा आषाढाचा पहिला दिवस, कालीदासाचे कूजित घेऊन येईल. आणखी एकदा श्रावणधारा सस्यशामलेला शहारतील. पुन्हा एकदा भाद्रपदाचे आकाश, विश्वाच्या अष्टदिशातून तुझ्या आगमनाची मंगल साद देईल. आणि मग निळ्या नभांच्या नीलसमुद्रावर, चंद्राच्या विमानात बसून, इंद्रधनुष्याचे शेले पेहेरून, तू गणसेवेच्या मखरामध्ये मुखर होण्यासाठी पुन्हा आरूढ होशील. त्या दिवसाची आर्तता सांभाळत, आज तुला निरोप. आणि त्या निमित्तानं आजवरच्या अनिश्चिततेला व कर्तव्यच्युतीलाही निरोप!
*— स्वामी विज्ञानानंद*

credit – मनशक्ती ग्रंथ ‘धर्मसंगती’ मधून

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित ⭕ अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे...
Read More
सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

पाटपन्हाळे महाविद्यालयात '६३ मुन्स'च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी AI आणि Machine Learning कोर्सेसची सुवर्णसंधी; 'MKCL'...
Read More
पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘६३ मुन्स’च्या सहकार्याने अत्याधुनिक संगणक कक्षाचे दिमाखात उद्घाटन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन पुणे (गुरुदत्त वाकदेकर): प्रा. जयंत खेडकर लिखित आणि स्नेहल प्रकाशन,...
Read More
अक्षरवेल येथे “चला गणित शिकू या” दहा पुस्तकांच्या संचाचे प्रकाशन

प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

प्रा. जहूर बोट 'सर्वोत्तम विद्यार्थी' पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश शृंगारतळी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा संपन्न; समृद्धीवर...
Read More
प्रा. जहूर बोट ‘सर्वोत्तम विद्यार्थी’ पुरस्काराने समृद्धी आंबेकर सन्मानित; पाटपन्हाळे विद्यालयाचे यश

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग

वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे रविवारी रात्री झालेल्या आयपीएल...
Read More
वानखेडेवर मुंबई इंडियन्सचा विक्रमी विजय; २२० धावांचा यशस्वी पाठलाग