कु.आयुषी सुभाष डाकवे हिला चतुरंग प्रतिष्ठान चा गोडबोले पुरस्कार प्रदान
गुहागर (मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता गुहागर जि रत्नागिरी या प्रशालेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. आयुषी सुभाष डाकवे हिला 2025-26 चा चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेतर्फे दिला जाणारा “सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार” मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याबद्दल कु.आयुषी हिचे प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यंदाच्या सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कारासाठी ५९ शाळांमधून ३६ शाळांतील ३६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.. या सर्वोत्तम विद्यार्थ्यांचे कौतुक करणारा पुरस्कार प्रदान सोहळा येत्या *रविवारी, ११ जानेवारी रोजी सकाळी ९.३० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूण येथे मोठ्या थाटात पार पडला..
या उपक्रमाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या सोहळ्यासाठी मेजर जनरल (नि.) शिशिर महाजन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच राष्ट्रीय कीर्तनकार डॉ. चारुदत्त आफळे यांनी शैक्षणिक विचार मांडले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी व त्यांचे पालक,मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षणप्रेमी, हितचिंतक असे बहुसंख्य लोक उपस्थित होते.















