जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर गुहागर मध्ये मोठी राजकीय उलथापालथ
(शिवसेना उप तालुका प्रमुख सुशील उर्फ बबलू आग्रे तसेच मुन्ना तावडे यांच्या प्रयत्नांना अखेर यश )
आबलोली (संदेश कदम)
भाजप उत्तर रत्नागिरी उपजिल्हाध्यक्ष तसेच ओबीसी नेते संतोष जैतापकर यांचा शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
संतोष जैतापकर यांचा आज चिपळूण चे माजी आमदार सदानंद चव्हाण तसेच युवा सेना जिल्हा प्रमुख मुन्ना देसाई यांच्या उपस्थितीत चिपळूण येथे जाहीर पक्ष प्रवेश करण्यात आला आहे.
संतोष जैतापकर यांच्या पक्ष प्रवेशामुळे असगोली जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या चिंतेत वाढ झाली आहे
शिवसेना गुहागर मधून असगोली जिल्हा परिषदेसाठी कोणता उमेदवार देणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे















