शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नालासोपारा (प.) यांच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त महा रक्तदान शिबिर संपन्न
नालासोपारा – संदीप शेमणकर
दानांमध्ये दान श्रेष्ठदान रक्तदान !
वसई विरार महानगर पालिका निवडणूक झाल्या शिवसैनिक लागले कामाला
शिवसेना नालासोपारा शहर( प ) अमी पार्क – पांचाळ लोढा नगर शाखा यांच्या वतीने रविवार दिनांक २५जानेवारी २०२६ रोजी. स्थळ –
सकाळी ९ : ०० ते सायं. ४ : ०० वाजेपर्यंत गॅलेक्सी हॉल, नालासोपारा (प). येथे
आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रक्तदान शिबिराला शिवसेनेच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी भेट दिली .
एकूण १३५ लोकांनी रक्तदान शिबिरास भेट दिली.
९० महिला व पुरुष रक्त दानासाठी उपस्थित होते.
काही महिला पुरुष हिमोग्लोबिन व अन्य कारणांमुळे रक्त दान करू शकले नाहीत. त्यामुळे ७८ लोकांनी रक्तदान केले. त्या सर्व रक्तदात्यांचे मनपुर्वक व खूप खूप आभार व्यक्त करण्यात आले.
विशेष सहकार्य लाभले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी महिला, पुरुष , शिवसैनिक, ज्येष्ठ नागरिक व युवासेना यांनी अथक मेहनत घेतली.शाखे तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
















