श्रीरामपूर स्नेहालय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीरामपूर स्नेहालय कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

श्रीरामपूर | प्रतिनिधी – नंदकुमार बगाडे पाटील

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका व श्रीरामपूर शहरात २६ जानेवारी २०२६ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीरामपूर येथील स्नेहालय कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमाला अहिल्यानगर जिल्हा पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष व आदर्श पत्रकार नंदकुमार बगाडे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम मंनचरे (पैठण), यशवंत सर (प्रकल्प व्यवस्थापक) व क्षेत्रीय अधिकारी वामन सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना नंदकुमार बगाडे पाटील म्हणाले की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान देशाला अर्पण केले. या संविधानामुळे श्रीमंतांपासून गरीबांपर्यंत सर्वांना समान जगण्याचा व मतदानाचा अधिकार मिळाला.”

ते पुढे म्हणाले की, “भारत देशासाठी अनेक महामानव, संत-महात्म्यांनी बलिदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणताही जातीभेद न करता बहुजन समाजासाठी महान कार्य केले.”

आजही आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे स्वाभिमानाने जगत आहोत, असे सांगून त्यांनी युवा पिढीला महामानवांचे विचार आचरणात आणण्याचे, आई-वडील व गुरुजनांची सेवा करण्याचे आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात स्नेहालय कार्यालयाचा ध्वजारोहण सुनिता उनवणे (क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी, श्रीरामपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला आकाश जावळकर, वैशाली घारे, लता बोंद्रे, सुमित्रा बगाडे, आरती जवळकर, मीराबाई भुसे, माया कांबळे, उषा आडमारे, सुरेखा गुप्ते, लक्ष्मी कांबळे, अनिता पगारे, आशा पवार, रुक्मिणी पाटील, मिरा यादव, लिलाबाई घोडके, विमल घोडके, राजश्री जवळकर, सुरेखाताई तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रकल्प समुपदेशक राहुल भोसले यांनी मानले. शेवटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना खाऊ वाटप करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात