केंद्र परिषद अंजनवेल व साखरी बुद्रुक यांच्या वतीने केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य सत्कार संपन्न.

highlight

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

केंद्र परिषद अंजनवेल व साखरी बुद्रुक यांच्या वतीने केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य सत्कार संपन्न.

गुहागर

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रांमध्ये ३८ वर्ष , प्रामाणिकपणे व कार्य तत्परतेने सेवा करून सेवानिवृत्त होत असल्याबाबत अंजनवेल व, साखरी बुद्रुक केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर नवानगर मराठी येथे संपन्न झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये सेवानिवृत्त गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी आर एच गळवे साहेब ,शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष व गुहागर तालुका शिक्षण समन्वय समितीचे तालुकाध्यक्ष अरविंद पालकर सर ,उर्दू संघटनेचे अध्यक्ष श्री साजिद मुकादम सर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर, उपाध्यक्ष रवींद्र जांभरकर ,त्यांचे पती नगरसेवक श्री विलास शिगवण, दापोली तालुक्यातून उपस्थित राहिलेले माजी केंद्रप्रमुख शिरसागर सर ,बेर्डे सर, खोत सर ,साखरी बुद्रुक केंद्र मुख्याध्यापक गणपत निंबरे ,अंजनवेल केंद्राच्या केंद्र मुख्याध्यापक सौ खामकर मॅडम ,वेलदूर नवानगर मराठी शाळेचे मुख्याध्यापक मनोज पाटील ,धोपावे नंबर एक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष गमरे ,तालुका समन्वयक मुथा फाउंडेशन विलास नरळकर ,तंत्रस्नेही शिक्षक श्री दिनेश जानवळकर ,पंचायत समिती गुहागरचे तंत्रस्नेही श्री किरण शिंदे, दोन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते .दोन्ही केंद्राच्या वतीने केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम यांचा गटशिक्षणाधिकारी आर एच गळवे साहेब यांचे शुभहस्ते मानपत्र, सन्मानिका,, फेटा बांधून, शाल ,श्रीफळ ,आकर्षक भेटवस्तू ,देऊन गौरव करण्यात आला.तसेच शाळा व्यवस्थापन समिती व दापोली येथून आलेल्या शिक्षक वर्गांकडून तसेच दोन्ही केंद्रातील मुख्याध्यापक यांचे कडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.शिक्षक नेते श्री अरविंद पालकर यांचे शुभ हस्ते दोन्ही केंद्राच्या वतीने गटशिक्षणाधिकारी आर एच गळवे साहेब यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्यावेळी दोन्ही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मनोगत व्यक्त करून शिगवण मॅडम यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या.नगरसेवक श्री विलास शिगवण, शिक्षक नेते,अरविंद पालकर व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सत्कार प्रसंगी आरोही शिगवण मॅडम भारावून गेल्या .संपूर्ण शैक्षणिक कारकीर्दीत ज्याने ज्याने सहकार्य केले त्या सर्व सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,ग्राम शिक्षण समिती अध्यक्ष ,पालक ,ग्रामस्थ ,अधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला .शैक्षणिक वाटचालीत आपल्या पतीचे योगदान मोलाचे लाभल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षिका अफसाना मुल्ला मॅडम, व डॉ मनोज पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दोन्ही केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात