दादरमध्ये समुत्कर्ष अभ्यासिकेचा वार्षिक महोत्सव उत्साहात; चित्रकार निशिकांत पलांडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दादरमध्ये समुत्कर्ष अभ्यासिकेचा वार्षिक महोत्सव उत्साहात; चित्रकार निशिकांत पलांडे यांचे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “यशाचा मार्ग हा नेहमीच खडतर प्रवासातून जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कष्टाचा बाऊ न करता आत्मविश्वासाने आणि सातत्याने पुढे वाटचाल करावी,” असे मौलिक विचार अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविलेले प्रसिद्ध चित्रकार श्री. निशिकांत पलांडे यांनी व्यक्त केले. सेवा सहयोग संस्थेच्या समुत्कर्ष अभ्यासिका प्रकल्पाचा वार्षिक महोत्सव रविवार, दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी दादर येथील बी. एन. वैद्य सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या श्री. पलांडे यांनी आपल्या बालपणीच्या खडतर जीवनप्रवासाचे अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर करत संघर्ष, सातत्य आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यातील वाटचालीसाठी नवी दिशा व ऊर्जा मिळाली.
या वार्षिक महोत्सवासाठी सफाळे, कर्जत, बोईसर तसेच मुंबई व ठाणे येथून आलेले ४०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक, स्वयंसेवक आणि कॉर्पोरेट प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे सभागृह पूर्णतः भरून गेले होते आणि कार्यक्रमाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले होते.
समुत्कर्ष वर्षिकोत्सव स्पर्धा दरवर्षी भारतीय संकल्पनांवर आधारित घेतल्या जातात. यंदा युनेस्कोने राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेल्या १२ गडकिल्ल्यांवर आधारित वक्तृत्व, कथाकथन, समूहनृत्य, एकपात्री प्रयोग, समूहगायन अशा एकूण ११ स्पर्धा विभागांमध्ये, तसेच अंतर्विभागीय स्तरावर डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
अंतिम फेरीत यश संपादन केलेल्या १०० हून अधिक विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांनी आपल्या कला-सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी प्रसिद्ध व्यावसायिक श्री. अंजनी अग्रवाल यांनीही विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी उद्बोधन केले. सेवा सहयोग फाउंडेशन शिक्षण, सबलीकरण आणि पर्यावरण या तीन महत्त्वाच्या आयामांवर आधारित एकूण १९ प्रकल्प राबवत असून, त्यातील समुत्कर्ष वार्षिक महोत्सव हा संस्थेच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण आणि उज्ज्वल पैलू असल्याची प्रचिती या सोहळ्यातून पुन्हा एकदा आली.

Gurudatta Wakdekar
Author: Gurudatta Wakdekar

???? गुरुदत्त दिनकर वाकदेकर- मुंबई ???? ???? ज्येष्ठ पत्रकार आणि समीक्षक - महाराष्ट्र मधील विवीध वृत्तपत्रातून लेखन आणि पत्रकारिता

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

//प्रेस नोट// मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ; एनसीईआरटी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL)...
Read More
मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्या प्रकरणी वंशज घराण्यांसह शिव-शंभुभक्तांमध्ये असंतोष ;

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत प्रशासकीय अनास्थेचा कळस: रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रात सुविधांचा...
Read More
गडचिरोलीत व्यवस्थेचा बळी! सक्शन मशीन खराब, रुग्णवाहिका चालक सुटीवर; महिलेचा दुर्दैवी अंत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत   गुहागर -डॉ मनोज नरसी पाटील यांची गुहागर...
Read More
डॉ मनोज पाटील यांची केंद्रप्रमुख पदी निवड झाल्याने गुहागर केंद्रामध्ये उस्फुर्त स्वागत

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू ! पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये होणाऱ्या...
Read More
बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू !

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!   रत्नागिरी...
Read More
संगमेश्वर पंचायत समितीचा ‘अजब कारभार’: जावक क्रमांक नसलेली पत्रे, दुहेरी सुनावणी आणि RTI माहिती ५ महिने तरीही गायब!

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): भारताच्या संविधानाच्या गौरवशाली परंपरेचा जागर करण्याच्या उद्देशाने भारतीय संविधानाच्या...
Read More
संविधान अमृत महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग : २.१४ लाख मताधिक्याने दणदणीत यश; विरोधकांना...
Read More
बारामती पोटनिवडणूक निकाल 2026: सुनेत्रा पवार यांचा विक्रमी विजय; अजित पवारांचा रेकॉर्ड भंग

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का **कोलकाता:** पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल आज जाहीर...
Read More
पश्चिम बंगालमध्ये ऐतिहासिक सत्तांतर; भाजपची मुसंडी, तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि...
Read More
डाॅ. सदानंद मोरे यांना तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार प्रदान

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात

पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात   पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत तितिक्षा...
Read More
पुण्यात तितिक्षा नाट्य कला साहित्य संमेलन, पुस्तक प्रकाशन व पुरस्कार सोहळा उत्साहात