मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मातोश्रीवर हायव्होल्टेज ड्रामा! उद्धव ठाकरेंच्या भाषणात प्रियंका चतुर्वेदींचा आक्षेप; ‘I want to protest’ म्हणत व्यक्त केली नाराजी

मुंबई

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षामध्ये सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे. ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच, मातोश्रीवर पार पडलेल्या खासदारांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा मोठा स्फोट झाला. उद्धव ठाकरे खासदारांना संबोधित करत असताना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी थेट आक्षेप घेतल्याने बैठकीत मोठा पेच निर्माण झाला होता.

नेमकं काय घडलं बैठकीत?

राज्यसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत हालचाली सुरू आहेत. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि के. सी. वेणुगोपाल यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला होता. या चर्चेचा तपशील उद्धव ठाकरे खासदारांना सांगत होते. विशेषतः राष्ट्रवादीसोबतचे (शरद पवार गट) संभाव्य वाद टाळण्यासाठी ठाकरे सावध भूमिका मांडत होते.

मात्र, याच दरम्यान प्रियंका चतुर्वेदी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी थेट इंग्रजीत विचारले, “I want to protest. Why Sanjay Raut was giving a statement about Sharad Pawar?” (मला निषेध नोंदवायचा आहे. संजय राऊत शरद पवारांबद्दल विधानं का करत आहेत?) चतुर्वेदींच्या या अनपेक्षित हस्तक्षेपामुळे उपस्थित सर्वच थक्क झाले.

उद्धव ठाकरेंनी सुनावले खडेबोल

प्रियंका चतुर्वेदींच्या या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी संयम न गमावता स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. त्यांनी बजावले की, “संजय राऊत बोलले म्हणून काय झाले? पक्षाचा प्रमुख मी आहे आणि अंतिम निर्णय मीच घेईन.” अशा प्रकारे ठाकरेंनी राऊतांची बाजू घेत चतुर्वेदींना शांत राहण्याचे संकेत दिले.

खासदारांची नाराजी आणि आदित्य ठाकरेंबाबत प्रश्न

या बैठकीनंतर वादाचे पडसाद उमटत राहिले. सूत्रांच्या माहितीनुसार:

* चतुर्वेदींवर टीका: मराठवाड्यातील एका खासदाराने उद्धव ठाकरेंना थेट विचारले की, प्रियंका चतुर्वेदी यांना सहा वर्षे संधी देऊनही पक्षाला काय उपयोग झाला?

* आदित्य ठाकरेंबद्दल तक्रार: यापूर्वी संजय राऊत यांच्या घरी झालेल्या चर्चेत काही खासदारांनी आदित्य ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीमुळे मर्यादा असल्या तरी आदित्य ठाकरे पूर्ण महाराष्ट्र का फिरत नाहीत, अशी तक्रार खासदारांनी केली होती.

* आदित्य ठाकरेंचे मौन: या सर्व राड्याच्या वेळी आदित्य ठाकरे बैठकीत उपस्थित होते, मात्र त्यांनी कोणत्याही खासदाराशी संवाद साधला नसल्याचे समजते.

>

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी