रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन .
रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने रविवार, दि. ५ एप्रिल २०२६ रोजी वधू-वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
भंडारी समाज संघाच्या माध्यमातून वेळोवेळी अशा मेळाव्यांचे आयोजन करून इच्छुक युवक-युवतींचे विवाह जुळविण्याचे कार्य केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा मेळावा रत्नागिरी येथील भैरव मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. इच्छुक वधू-वर तसेच घटस्फोटित इच्छुकांनी स्वतः व पालकांसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
मेळाव्यासाठी प्रवेश फी ५०० रुपये ठेवण्यात आली असून सहभागी होताना जन्मपत्रिका, शैक्षणिक झेरॉक्स, फोटो तसेच स्वतःचा बायोडाटा आणणे आवश्यक आहे. उपस्थितांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
या मेळाव्याचे आयोजन रत्नागिरी तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले असून समाजातील युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळावा, हा यामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.















