शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश
अधिकारी घडविण्याची परंपरा कायम
आबलोली (संदेश कदम)
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवली या विद्यालय मधील कु. विवेक बुटटे ,कु.प्रणव पाटील व कु.सुदर्शन कोष्टी यांनी महाराष्ट्र लोक सेवा आयोग, आयबिपीएस व सरळसेवा या परीक्षांमध्ये दैदीप्यमान यश संपादन केले. या परीक्षामधुन कु. विवेक याची कृषि अधिकारी पदी निवड झाली. कु. प्रणव पाटील याची रिजनल रुरल बँकेमध्ये प्रोबेशनरी ऑफीसर ( वर्ग एक) पदी निवड झाले तसेच कु.सुदर्शन कोष्टी याची ग्रामसेवक पदी निवड झाली. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार शेखरजी निकम, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील व सेक्रेटरी महेश महाडिक यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे.













