मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून
कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

रत्नागिरी

दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ अंतर्गत असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी’ ‘मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ आणि ‘आसमंत फाउंडेशन, रत्नागिरी’ याच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ‘मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणाचे’ यशस्वी आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम आसमंत फाउंडेशन, रत्नागिरीच्या महिला सबलीकरण कार्यक्रम अंतर्गत ‘परिषद दालन, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी’ येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विदयापीठ, दापोलीचे सन्मानिय कुलगुरु डॉ. संजय भावे, मा. संचालक, विस्तार शिक्षण, डॉ. राजेश ठोकळ, मा. संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यक्रम आयोजन करण्याकरिता आसमंत फौंडेशन, रत्नागिरी कडून आर्थिक साह्य मिळाले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास करायचा असेल तर, पकडलेल्या मासळीवर प्रक्रिया करून मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ तयार करणे गरजेचे आहे, जेणेकरून मच्छिमारांच्या उत्पन्नात वाढ होईल असे सांगितले. मत्स्य पदार्थ निर्मितीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी मा. कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी निर्देशित केल्याप्रमाणे सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्र आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन यांनी घेतली आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, श्री. चिन्मय दामले, जिल्हा समन्वयक, जलजीविका संस्था, रत्नागिरी तसेच लोककल्प फाउंडेशन, रत्नागिरी चे श्री. अभिषेक कात्रे हे उपस्थित होते.
या मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक-प्रशिक्षणा मध्ये एकूण ६९ लाभार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रम मुख्यता उमेद-क्रांती प्रभाग संघ च्या तिवंडेवाडी, बसणी, शिरगाव, काळबादेवी येथील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. कोलिम चटणी, कोळंबी लोणचे, कालवांचे लोणचे यांचे प्रात्यक्षीक सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे श्रीमती अपूर्वा सावंत, श्रीमती वर्षा सदावर्ते, डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, श्री. तेजस जोशी, श्री. प्रशांत पिळणकर आणि प्रा. सचिन साटम यांनी करून दाखविले. बोंबील चटणी व मत्स्य चकली यांचे प्रात्यक्षीक जलजीविका, रत्नागिरीचे समृद्धी सनगरे, सृष्टी यांनी करून दाखविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मयुरी डोंगरे (मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन) यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. नंदिनी शेटये (काळबादेवी) यांनी केले.
सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सहभागी शेतकरी महिलांपैकी श्रीमती सोनाली शिवलकर (क्रांती, एफ.पी.ओ., मास्टर सी.आर.पी.) यांनी मनोगत व्यक्त केले आणि प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यास मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान, रत्नागिरी येथील श्री. निलेश मिरजकर, डॉ. राकेश जाधव, श्री. सुशील कांबळे, श्री रोहित बुरटे, श्री. पंकज सिडाम, श्री संदेश चव्हाण, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकरी डॉ. मनोज घुगुस्कर, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, श्रीमती वर्षा सदावर्ते आणि श्रीमती अपूर्व सावंत तसेच श्री. प्रवीण गायकवाड व श्री. केतन चव्हाण यांनी मेहनत घेतली. तसेच जलजीविका, रत्नागिरीचे पीयूषा देसाई, शशांक पंडित, सुमित कुळये, लोककल्प फाउंडेशनचे श्री. जोशी आणि श्री हरमळे यांनी मेहनत घेतली. तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव च्या विद्यार्थ्यांनी सुद्धा विशेष परिश्रम घेतलेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): सेवा मंडळ एज्युकेशन...
Read More
श्रीमती मणिबेन एम. पी. शाह महिला महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट ड्राइव्ह; विद्यार्थिनींना करिअरच्या नव्या संधी

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड प्रतिनिधी :- निलेश रहाटे    कल्याण डोंबिवली...
Read More
भोपरमध्ये पाणीटंचाई कायम; अपुरा पुरवठा तरीही पूर्ण वर्षाची बिल – अधिकाऱ्यांची बेफिकीरी उघड

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न गुहागर ~श्रीराम नाट्य मंडळाचे दिग्गज कलावंत...
Read More
नाट्य कलावंत व भजनी कलावंत श्री मारुती रोहीलकर यांचा वेलदुर नवानगर शाळेमध्ये सत्कार संपन्न

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी रत्नागिरी - दिनांक १७ मार्च २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब...
Read More
मूल्यवर्धित मत्स्यपदार्थ’ व्यवसायातून कोकणातील महिलांचा शाश्वत विकास शक्य- डॉ. केतन चौधरी

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयपीएल २०२६ मधील २५व्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता...
Read More
गिलचा झंझावात, गुजरातची कोलकातावर ५ गडी राखून मात

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी अवकाळी पाऊस आणि उष्णतेमुळे ९० टक्के हापूस आंबा बागांचे...
Read More
कोकणातील शेतकऱ्याला भरघोस मदत द्यावी; रामदासभाई कदम यांची सरकारकडे आग्रही मागणी

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश

गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश वेळणेश्वर: गुहागर तालुक्यातील जलजीवन...
Read More
गुहागर: जलजीवन मिशनची ३० टक्के शिल्लक कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करा; सभापती प्रणव पोळेकर यांचे निर्देश

दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी नवीमुंबई (मंगेश जाधव ) महामानव भारतरत्न...
Read More
दक्षिण मुंबईतील वरळी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा शासकीय रुग्णालयाची कामगिरी उंचावली;...
Read More
पीएचसीमधून खासगी रुग्णालयांकडे डिलिव्हरीसाठी पाठवणाऱ्यांवर कारवाई; 14 रुग्णवाहिकांचा प्रस्ताव द्या – पालकमंत्री डॉ. उदय सामंत

देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू 

देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू  अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घरोघरी होणार देवीचे...
Read More
देव भक्तांच्या भेटीला येतोय! तवसाळमध्ये श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी उत्सव सोहळा उत्साहात सुरू