तळवली महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्राहकांमध्ये रोष महावितरणाचा रात्रीस खेळ चाले!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत ग्राहकांमध्ये रोष

महावितरणाचा रात्रीस खेळ चाले!

तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव ) सध्या गुहागर तालुक्यातील तळवली पंचक्रोशी भागात वीजपुरवठाखंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसत असून वसुलीचा बडगा उगारणारे महावितरण अधिकारी सेवा देताना तेवढी तत्परता दाखवत नसल्याने ग्राहकांमध्ये महावितरणच्या ढिसाळ कारभाराबाबत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

गेल्या आठवडाभरापासून गुहागर शहरासह ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. दिवस-रात्र कधीही बत्ती गुल होतेय. तालुक्यात खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा फटका छोट्या व्यावसायिकांना बसत आहे. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने दुग्धजन्य पदार्थ विक्रेते, गोठवलेले खाद्यपदार्थांचे विक्रेते यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याशिवाय इतर व्यावसायिकही हवालदिल झाले आहेत.

वीजपुरवठा सतत खंडित झाल्याने याचा फटका बँक, दवाखाना, प्रशासनाची सुविधा केंद्रे व सेतू सेवा केंद्राला बसत असतो. नेटवर्क सेवा बंद असल्यास सरकारी कामे रखडतात. कागदपत्रे, दाखले घेण्यासाठी आलेले नागरिक व विद्यार्थ्यांना खोळंबून रहावे लागते. तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर ताटकळत रहावे लागते. सतत वीजपुरवठा खंडित होत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होऊन आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय.

सतत खंडीत होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे तळवलीतील हॉटेल व्यवसायिक पुरते हैराण झाले आहेत. हॉटेल व्यवसायात फ्रिज, डीप फ्रीजर, कोल्ड स्टोरेज यावरच अन्नाची सुरक्षितता अवलंबून असते. परंतु वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने दूध, मांस, भाज्या, आईस्क्रीम यांसारख्या वस्तू खराब होत असून परिणामी ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होताना दिसतो.

याशिवाय शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कमी दाबाच्या वीजपुरवठ्याने फ्रीज, टिव्ही, कॉम्प्युटर, लॅपटॉप, पंखा अशा विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होत असून याचा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागतोय, यामुळे महावितरण विरोधात नाराजी उमटल्याचे दिसून येते.

एकीकडे वीजबिल भरणा न केल्यास महावितरणकडून तातडीने वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मात्र कमी दाबाने होणारा वीजपुरवठा तसेच सातत्याने खंडित होणारा वीजपुवठा आणि त्यातच असह्य उन्हामुळे उकाडा, यामुळे ग्राहक मेटाकुटीस आले असतानाही महावितरणकडून वीजपुरवठ्याबाबात ठोस कार्यवाही केली जात नसल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी