20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन
राजापूर – वार्ताहर -प्रशांत पवार
अखिल भारतीय केमिस्ट असोसिएशन ने 20 मे रोजी पुकालेल्या बंद बाबतचे निवेदन मा. प्रांतधिकारी राजापूर, मा. तहसीलदार गमरे , मा. पोलीस निरीक्षक यादव राजापूर यांना देण्यात आले यामध्ये
मा.प्रफुल्ल लांजेकर सचिव राजापूर तालुका केमिस्ट असोसिएशन
मा.आदिल चौगुले खजिनदार
मा.राजीव सोलगावकर सह
सचिव
याच बरोबर तालुक्यातील केमिस्ट बंधूउपस्थित होते.
अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने (AIOCD)ऑनलाईन इंटरनेट फर्मासिबाबत सरकारच्या नीती तसेच GSR 817(E)DT.28.08.2018 व गँसर( E)DT.26.03.2020 मागे घ्यावेत यासाठी बुधवार दि 20मे 2026 रोजी सपूर्ण भारतातील औषध विक्रेता यांनी बंद जाहीर केला आहे
यामध्ये स्वस्त दिसणाऱ्या ऑनलाईन ऑफर आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात ऑनलाईन औषध खरेदी यांच्या त गंभीर धोके होऊ शकतात यासाठी बंद पुकारण्यात येणार आहे यामध्ये
*खोटी बनावट प्रिस्किपक्षण*,
*बोगस व निकृष्ठ औषधा चा धोका*,
*एन्टीबीओटीक अनियत्रीत वापर केल्याने रेक्सिस्टन्स वाढण्याचा धोका*,
*तरुण पिढीचा नशेच्या औषधचा वाढता गैरवापर*,
*तापमान व साठवणूक नियमांकडे दुर्लक्ष*
आपल्या केमिस्ट बांधवाकडून आपल्याला योग्य मागदर्शन करून
*डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधें देतो*,
*एन्टीबीओटीक चा योग्य वापर समजावून मार्गदर्शन करतो*,.
*सुरक्षित, प्रामाणिक व गुणवत्ता पूर्वक औषधे उपलब्ध करून देतो*,.
*जबाबदारी नैतिक तेने व विश्वासाने सेवा देणे*
याबाबत महत्वाच्या सूचना मा.वसंत गोंधळी (जिल्हाध्यक्ष रत्नागिरी )व मा. वैभव कोकाटे (जिल्हा सचिव ) यांनी याबाबतीत महत्वाच्या सूचना औषध विक्रेता यांना केल्या आहेत त्यामध्ये 15मे2026 ते 19मे 2026 पर्यंत दुकानातील मालक, फर्मासिस्ट व कर्मचारी यांनी आपल्या शर्ट वर काळ्या फिती लावून कामावर जायचे आहे
दि. 19मे 2026 रोजी मध्यरात्री 12वाजल्यापासून ते 20 मे 2026 रोजीच्या मध्यरात्री 12वाजेपर्यंत आपल्या तालुक्यातील सर्व औषध दुकानें बंद पाळतील यांची दक्षता घ्यावी असे सूचित करण्यात आले आहे
















