दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा रत्नागिरीत उभारणार भव्य पूर्णकृती पुतळा..

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

???? दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा रत्नागिरीत उभारणार भव्य पूर्णकृती पुतळा..,

▶️  पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.

????  रत्नागिरी (गणेश तळेकर)- भंडारी समाजाचे श्रद्धास्थान, दानशूर, भक्तिभूषण श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा पूर्णाकृती पुतळा रत्नागिरीत व्हावा यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी शब्द दिला होता. त्यानुसार भंडारी समाजाला दिलेला हा शब्द पाळत भागोजीशेठ यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन काल (मंगळवार दिनांक 8 ऑक्टोबर) सायंकाळी ४ वाजता साळवी स्टॉप येथील भागोजीशेठ कीर प्रवेशद्वाराशेजारी पालकमंत्री उदय सामंत यांचे हस्ते पार पडला. याबद्दल रत्नागिरीतील समस्त भंडारी समाज व रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघातर्फे आनंद व्यक्त करून पालकमंत्री सामंत यांचे आभार मानण्यात येत आहेत.

रत्नागिरीतील साळवी स्टॉप येथील प्रवेशद्वाराशेजारी भागोजीशेठ कीर यांचा हा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे. पुतळ्याशेजारी भागोजीशेठ यांच्या महान कार्याची महती सांगणारे शिलालेखही स्थापित करण्यात येणार आहेत. या स्मारकाद्वारे त्यांचे अखंड मानवतेसाठी केलेले कार्य संपूर्ण रत्नागिरीकरांना प्रेरणादायी ठरणार आहे. समस्त रत्नागिरीकरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

भागोजीशेठ कीर यांनी आपल्याला जे मिळाले नाही ते इतरांना मिळावे, आपल्याकडे जे आहे ते आपले नसून ईश्वराचे आहे असे मानून आपली स्वकष्टार्जित सर्व संपत्ती संपूर्ण मानवतेसाठी अर्पण केली. त्यांनी स्वखर्चाने देशातील पहिले पतित पावन मंदिर बांधले, महाराष्ट्रात अनेक शाळा, गोशाळा, धर्मशाळा, महीला विद्यालय, मंदिरे, पाणवठे, विहिरी, स्मशानभूमी, स्वखर्चाने बांधून लोकार्पण केल्या. त्यांच्या या महान कार्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर हे भारतातले एकमेव आधुनिक कर्ण ठरले आहेत. रत्नागिरीत उभारल्या जाणाऱ्या पुतळ्याद्वारे रत्नागिरीच्या या सुपुत्राचा आता आपल्या पतीतपावन भूमीत योग्य सन्मान होणार आहे.

भागोजीशेठ कीर यांचा हा पुतळा कसा असावा यासंदर्भात पालकमंत्री उदयजी सामंत यांनी रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांच्याशी चर्चा केली होती. भागोजीशेठ यांचा खुर्चीवर स्थानापन्न असा फोटो कांचन मालगुंडकर यांनी सामंत यांना दाखवला असता, तो त्यांच्या पसंतीस उतरला आणि त्यानुसार पुतळ्याची पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्यात येत आहे. लवकरच हा पुतळा रत्नागिरीच्या प्रवेशद्वाराशेजारी स्थापित होणार आहे.

पालकमंत्री सामंत यांना रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर यांनी पुतळ्याचे स्वरूप ठरविण्यासाठी जेव्हा भागोजीशेठ यांची फोटो फ्रेम देऊ केली त्यावेळी समाजाचे माजी नगरसेवक सुदेशजी मयेकर व युवा भंडारी मंथन मालगुंडकर उपस्थित होते. समाजासाठी वारंवार पाठपुरावा करणारे संघाचे अध्यक्ष राजीवजी कीर यांचे यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

तरी दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर पूर्णाकृती पुतळा स्मारकाच्या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होतें.भंडारी समाज बांधव व समस्त रत्नागिरी तील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होतें
….

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी