गुहागर महायुतीतून भाजपच लढणार आणि जिंकणारही— निलेश सुर्वे.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

गुहागर महायुतीतून भाजपच लढणार आणि जिंकणारही— निलेश सुर्वे.

तळवली (वार्ताहर)-

सन्मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, कोकणचे पालक सन्मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांचे गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष

भारतीय जनता पार्टीकडुन माजी आमदार डॉ.विनय नातूच नेतृत्व करणार

जिल्हाध्यक्ष मान.केदारजी साठे यांनीही गुहागर विजयासाठी कंबर कसली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची पूर्ण क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. मात्र भाजपा हा पक्षशिस्त मानणारा पक्ष असल्यामुळे पक्ष आदेशानुसार जिल्ह्यात गुहागरकडे लक्ष केंद्रीत.

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच बहुचर्चेत असणारा गुहागर विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतून भारतीय जनता पार्टीच लढणार आणि नुसत लढणार नसुन महायुतीतून भाजपाचा विजय होणार असल्याचे भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी म्हटले आहे.

गुहागर विधानसभा मतदारसंघाबाबत नुकत्याच उपमुख्यमंत्री सन्मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष सन्मा.बावनकुळे साहेब आणि कोकणचे पालक सन्मा. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या सोबत झालेल्या भेटीत गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपालाच मिळणार असल्याचे स्पष्ट संकेत या तीनही वरिष्ठानी दिले आहेत.

हा मतदारसंघ गेली अनेक वर्ष युतीतून भाजपाच्या नेतृत्वात होता. मध्यंतरीच्या काळात काही बदल झाले असले तरी या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे. या मतदारसंघातून माजी आमदार डॉ. विनयजी नातू हेच पुन्हा नेतृत्व करणार आहेत. नातूंसारखा १६ वर्षाचा पूर्वानुभव असलेला, अभ्यासू शांत,संयमी चेहरा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यामुळे भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील घटक पक्ष व विधानसभा मतदारसंघात नवचैतन्य आणि उत्साह आहे.

रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ५ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रत्नागिरी, दापोली असे २ आणि चिपळूण राष्ट्रवादीचा १ असे महायुतीतील घटक पक्षांचे ३ आमदार आहेत. राजापूर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना लढणार असल्याचे नक्की होत असताना एकमेव शिल्लक असलेला गुहागर विधानसभा मतदारसंघ हा भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत वरिष्ठांनी दीड दोन वर्षापासूनच दिलेले आहेत. खरंतर रत्नागिरी जिल्ह्यात ५ ही विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार देण्याची क्षमता भारतीय जनता पार्टीमध्ये या क्षणाला नक्कीच आहे. मात्र भारतीय जनता पार्टी हा पक्ष पक्षशिस्त आणि पक्षाचा आदेश मानणारा पक्ष असल्याने महायुतीतील सर्व घटक पक्षांचा आदर राखत आणि महाराष्ट्रात पुन्हा महायुतीची सत्ता येण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्ह्यात फक्त एकमेव गुहागर विधानसभा मतदारसंघाकडे पूर्ण जिल्ह्या भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मा‌.केदारजी साठे साहेब यांच्या नेतृत्वात या विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवरची भारतीय जनता पार्टीची पक्ष संघटनेची रचना पूर्ण झाली असून “मेरा बुथ सबसे मजबुत” या पक्षाच्या धोरणाप्रमाणे प्रत्येक बूथ वरती मोठे मताधिक्य घेण्याची भारतीय जनता पार्टीची महायुतीच्या माध्यमातून तयारी झाली आहे आणि म्हणूनच पक्ष संघटनेने मागील २ वर्षापासून सांगितल्याप्रमाणे गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याचे गुहागर भाजपा तालुकाध्यक्ष आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य निलेश सुर्वे यांनी सांगितले आहे.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

highlits

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी भिवंडी:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) अध्यक्ष आणि...
Read More
हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाचा महसूल वाढेल: रामदास आठवले यांची अजब मागणी

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल   UPI व्यवहार...
Read More
१ जूनपासून ६ मोठे आर्थिक बदल लागू; UPI, LPG, ATM शुल्क ते शेअर बाजार नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा 2 लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजारांचे...
Read More
10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश २२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक...
Read More
डोंबिवली पश्चिमेचा वीज प्रश्न मिटला! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठे यश२२० kV माणकोली उपकेंद्रामुळे डोंबिवलीकरांची भारनियमन आणि तांत्रिक बिघाडांतून कायमची सुटका; रेल्वे रुळांखालील केबल्सचा धोका टळला

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...