वेलदूर नवानगर शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वेलदूर नवानगर शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन.

  गुहागर -(वार्ताहर) मतदारांमध्ये मतदानाबाबत जाणीव जागृती व्हावी, मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने वेलदूर नवानगर मराठी शाळेतर्फे मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते .त्यावेळी वेलदुर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरंकर ,अंजली मुद्दामवार ,सुषमा गायकवाड ,धन्वंतरी मोरे, अफसाना मुल्ला व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते! त्यावेळी मतदान जनजागृती विषयक घोषवाक्य , तसेच घोषणा देण्यात आल्या !गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी माननीय श्री रायचंद गळवे साहेब यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्विप उपक्रमा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करणे बाबत व मतदान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले होते .सदरची प्रभाग फेरी ही केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम मुख्याध्यापक मनोज पाटील ,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शिल्पाताई कोळथरकर व उपाध्यक्ष संजना फुणगुसकर यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. प्रभात फेरीच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंद यांनी प्रयत्न केले.

plz Join whatsup group 👇https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...