आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप तर्फे  सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात संपन्न.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप तर्फे  सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात संपन्न.

आबलोली येथे स्वरचैतन्य ग्रुप तर्फे  सूरमयी दिवाळी पहाट उत्साहात संपन्न.

.!

आबलोली (संदेश कदम)

गूहागर -स्वरचैतन्य ग्रुप, आबलोली तर्फे दिवाळी पहाट,रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन, कौस्तुभ सुतार यांचे शिल्प प्रात्याक्षिक आणि “अभिजात मराठी भाषेचा गौरवशाली वारसा” या विषयावर प्राध्यापक अमोल पवार यांची मुलाखत अशा भरगच्च कार्यक्रमांनी कला रसिक मंत्रमुग्ध झाले. गुहागर तालुक्यातील आबलोली येथील वासुदेव पांचाळ यांचे निवासस्थान, साई माऊली गॅरेजच्या शेजारी, पांचाळवाडी येथे स्वरचैतन्य ग्रुप तर्फे आबलोलीत सुरमयी दिवाळी पहाट हा कार्यक्रम जल्लोषात आणि उत्साहात संपन्न झाला. या पार पडलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गायक गितेश पांचाळ, गौतमी वाडेकर, अक्षय सुतार, पखवाज वादक संदेश पांचाळ, तबलावादक उमेश पांचाळ, हार्मोनियम गिरीश पांचाळ, टाळ वादक शुभम पांचाळ आणि निवेदक प्रतीक्षा पांचाळ यांनी बहारदार मैफिल रंगवली. बाल गायक नुरवी पांचाळ, सर्वज्ञा पांचाळ, स्वरा पेढे, यश डिंगणकर यांनीही आपली गीते सादर करून उपस्थित कलारसिकांची वाहवा मिळवली.दिवाळी पहाटचे हे सातवे वर्ष होते.

दिवाळीचे औचित्य साधून ‘स्वरचैतन्य रंगत कलांची-संगत सुरांची’या भावनेने आयोजित दिवाळी पहाट कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अर्पिता साळवी, रामपूर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. आयोजकांच्या वतीने विजेत्यांना व सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र, भेटवस्तु देऊन गौरविण्यात आले. शिल्पकलाकार कौस्तुभ सुतार यांनी शिल्प प्रात्यक्षिक सादर केले. त्यांनी सदानंद पांचाळ यांचे हुबेहूब मूर्ती चित्र तयार केले आणि रसिकांची उस्फूर्त दाद मिळवली. मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याचे औचित्य साधून ‘अभिजात मराठीचा गौरवशाली वारसा’ या विषयावर वझे केळकर महाविद्यालय मुलुंड चे प्राध्यापक अमोल पवार यांच्याशी निवेदक वैष्णवी पांचाळ यांनी संवाद साधला. या मुलाखतीत मराठी भाषेची थोरवी, प्राचीन परंपरा, अभिजात भाषेचे निकष, भाषेच्या उत्कर्षासाठी आपण करायचे प्रयत्न आदी विविध विषयांवर प्राध्यापक अमोल पवार यांनी आपले विचार व्यक्त केले. या संवादात्मक मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थित रसिकांनी सहभाग घेत विचारांचे आदान प्रदान केले.

या सर्व उपक्रमांना मोठ्या प्रमाणात कलारसिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदानंद पांचाळ, वासुदेव पांचाळ, गणपत पांचाळ, श्रीकांत पांचाळ, विनायक सुर्वे, संदेश पांचाळ, गिरीश पांचाळ, गितेश पांचाळ, गौरव पांचाळ,पंकज पांचाळ, प्रतीक्षा पांचाळ, वैष्णवी पांचाळ, सान्वी पांचाळ, वृषाली पांचाळ यांनी विशेष प्रयत्न केले.

Plz Join whatsup group ???? https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Plz Follow my whatsup Chanel ????http://Follow the Ratnagiri Vartahar channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vap8D1lI7BeLiZHQLS1S

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न