झारखंडमध्ये 68 टक्के मतदान, 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

झारखंडमध्ये 68 टक्के मतदान, 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

झारखंड – विधानसभा निवडणुकीच्या दुसऱया आणि शेवटच्या टप्प्यात 12 जिह्यांतील 38 जागांसाठी काल मतदान झाले. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 68 टक्के मतदानाची नोंद झाली. या टप्प्यात 528 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी झारखंड मुक्ती मोर्चा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. बोगस मतदान झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन उमेदवार असलेल्या गांडेय विधानसभेच्या बूथ क्रमांक 282 आणि 338 च्या पोलिंग एजंट्सवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या बाजूने मतदानाची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. झारखंडमध्ये 14 हजार 218 मतदान केंद्रे असून त्यात 239 मतदान केंद्रे ही महिलाकेंद्रित आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केल्यापासून 200 कोटी रुपयांची अवैध रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. 2019 मध्ये झामुमो काँग्रेस आणि आरजेडी युतीने 47 जागा तर भाजपाने 25 जागा जिंकल्या होत्या.

*झामुमो-भाजपमध्ये हाणामारी*

गिरीडीह येथील हनी होली विद्यालयात 15,16 आणि 17 क्रमांकाच्या बूथवर झामुमो आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. एका पक्षाला एका विशिष्ट धर्माचे लोक बोगस मतदान करत असल्याचे सांगण्यात आले.

त्यामुळे भाजप समर्थक आक्रमक झाले. या गोंधळाची माहिती मिळताच झामुमोचे आमदार सुदिव्य कुमार सोनू तेथे आले आणि भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्यातील वाद हाणामारीवर गेला. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही पक्षांना शांत करून वातावरण शांत केले.

रिटर्निंग ऑफिसरला अटक

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी देवघर जिह्यातील मधुपूर विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 111 वर पीठासीन अधिकाऱ्याने कथित गैरवर्तन केल्याबद्दल निवडणूक आयोगाकडे तक्रार केली.

झारखंड मुक्ती मोर्चाचे उमेदवार आणि मंत्री हाफिझुल हसन यांच्या बाजूने अधिकाऱ्याने पक्षपातीपणा दाखवला, असा दावा दुबे यांनी केला. या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने कारवाई केली. संबंधित पीठासीन अधिकाऱ्याला अटक करण्यात आली.

*स्पष्ट बहुमत मिळेल*

आम्हीच पुन्हा सत्तेवर येणार असा दावा सातत्याने महायुतीचे नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करत आहेत. अजित पवार यांनी तर महायुतीला किती जागा मिळतील याचेही भाकीत वर्तवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तो दावा खोडून काढला आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचेच सरकार येईल आणि ते स्पष्ट बहुमताचे असेल असा ठाम दावा शरद पवार यांनी आज केला. महायुतीचे सरकार राज्यात येणार असून 175 जागा मिळतील असा दावा अजित पवार यांनी काटेवाडी येथे केला होता. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

अजित पवार यांनी सांगितलेल्या संख्येचा संदर्भ लक्षात घेता त्यांनी फक्त 175 जागा सांगितल्या, 280 सांगायला पाहिजे होत्या, असा मिश्कील टोलाही शरद पवार यांनी लगावला. महाविकास आघाडीच सत्तेवर येईल पण नेमक्या किती जागा येतील हे सांगायला आपण ज्योतिषी नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

*सरकार आमचेच येणार*

विधानसभा निवडणुकीत जनतेचा दांडगा उत्साह दिसला. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महाराष्ट्राच्या हिताचे सरकार निवडेल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळय़ा दगडावरची रेष आहे, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज व्यक्त केला. भाजपने निवडणुकीत संविधान व्यवस्थेचे उल्लंघन केले आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे विरारच्या हॉटेलमध्ये पैसे वाटताना पकडले गेले. तावडेंचा तो मतदारसंघ नसताना ते तेथे काय करत होते, असा सवाल पटोले यांनी केला.

आर्वीचे भाजप उमेदवार वानखेडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. या वानखेडेंच्या गोदामात दारूच्या बाटल्यांचा साठा सापडला. वर्ध्यात दारूबंदी असतानाही हा दारूसाठा कसा आला? मतदारांना पैसे व दारू वाटून मते मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असे पटोले म्हणाले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound