महायुतीत निकाला आधीच मुख्यमंत्रिपदावरूनरस्सीखेच.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

महायुतीत निकाला आधीच मुख्यमंत्रिपदावरूनरस्सीखेच?

भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचाही मुख्यमंत्रिपदावर दावा

मुंबई -महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान पार पडलं. आता शनिवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल. महाराष्ट्रासह देशभरातील जनतेचं या निकालाकडे लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी निवडणूक निकालाचे एक्झिट पोलदेखील समोर आले आहेत. या पोल्स नुसार महायुतीचं पारडं जड दिसत आहे. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत जवळपास सर्वच एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. त्यामुळे यंदा काय निकाल लागतो? याबाबत जनतेमध्ये उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दावा केला आहे की राज्यात आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही लवकरच राज्यात सरकार स्थापन करू. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर महायुती मधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकाला आधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदा वरून रस्सीखेच चालू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.यावेळी त्यांना विचारण्यात आलं की महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेईल?भाजपा कार्यकर्त्यां ची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असावेत. यावर बावनकुळे म्हणाले,“भाजपा कार्यकर्त्यंना १०० टक्के वाटतं की आमचा नेताच मुख्यमंत्री व्हायला हवा. देवेंद्र फडणवीस मुख्यमत्री व्हावेत असं सर्वांनाच वाटतं. त्याचप्रमाणे शिवसेनेला (शिंदे) वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांना वाटतं की अजित पवार मुख्यमंत्री व्हायला हवेत. अखेर मुख्यमंत्रीपदाबाबत केंद्रीय नेतृत्व व राज्यातील हे तीन प्रमुख नेते (एकनाथ शिदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील.

दरम्यान, बावनकुळे यांच्या वक्तव्यावर आता शिवसेनेकडून (शिंदे) प्रतिक्रिया आली आहे. शिवसेनेचे आमदार व प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, भाजपा चा नेता मुख्यमंत्री व्हावा असं बावनकुळे यांना वाटणं स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे आम्हालाही वाटतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हायला हवा. परंतु, आम्ही महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन निवडणूक लढलो. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे. निकालानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज   केंद्रीय वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केलेले...
Read More
कर्तव्याच्या कसोटीवर घडणारा भारत : आर्थिक आत्मनिर्भरतेचा निर्णायक दस्तऐवज

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत

वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत नवीमुंबई (प्रतिनिधी )-गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर गावचे सुपुत्र सध्या...
Read More
वेळणेश्वर गावचे सुपुत्र विनोदवीर मा. मकरंद वैद्य यांना राज्यस्तरीय कलारत्न पुरस्काराने सन्मानीत
Play sound