एक लाखाच्या मताधिक्याने लांजा राजापूर साखरपा विधानसभेतून निवडून येणार — किरण सामंत

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आपला विजय हा राजापूर मतदार संघातील ऐतिहासिक असा विजय असेल -किरण सामंत 

एक लाखाच्या मताधिक्याने लांजा राजापूर साखरपा विधानसभेतून निवडून येणार — किरण सामंत

राजापूर

भावनिक राजकारण विरूध्द विकास अशी राजापूर विधानसभा मतदार संघातील निवडणूक होती. या मतदार संघातील जनतेला विकास हवा आहे. त्यामुळे जनतेनेच ही निवडणूक आपल्या हाती घेतली होती.

त्यामुळे मतदारांनी भरभरून मतदान केले असून या मतदार संघातुन आपण एक लाखाच्या मताधिक्क्याने विजयी होऊ असा दावा महायुतीचे उमेदवार किरण सामंत यांनी केला आहे.*

*जे काही स्वयंम घोषित नेते आणि पक्ष प्रवेश केलेले उ. बा. ठा. कडे शिल्लक पदाधिकारी होते त्यांच्या भागातही आपणच मताधिक्क्य घेतलेले असेल हे शनिवारी मतदान यंत्रे उघडल्यावर दिसून येईल असेही किरण सामंत यांनी नमुद केले.*

बुधवारी मतदान प्रक्रिया संपल्यावर किरण सामंत यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी आपल्या विजयाचे गणित मांडले. या मतदार संघातील जनतेला आता विकास हवा आहे, तो विकास कोण कशा पध्दतीने करू शकतो याचा विश्वासही जनतेला आता पटलेला आहे.

त्यामुळे ही निवडणूक ही मतदार संघातील जनतेनेच हाती घेतली होती. त्याची प्रचिती प्रचारासाठी फिरताना येत होतीच पण मतदानाच्या दिवशी मतदारांनी भरभरून मतदान करून परिवर्तन घडविणार असल्याचे दाखवून दिले आहे.

मतदार संघातील माझ्या भगिनींनी, युवक युवतींनी भरभरून मतदान केले आहे. या मतदार संघातील सुशिक्षित मतदारांनी पक्ष विरहित या मतदार संघाचे भविष्यातील विकासाचे व्हीजन डोळयासमोर ठेऊन मतदान केले आहे.

त्यामुळे आपला विजय हा ऐतिहासिक विजय असेल असा विश्वासही किरण सामंत यांनी व्यक्त केला.

भावनिक राजकारणाला आता मतदारांनीच तिलांजली दिली आहे. आंम्हाला पोकळ आश्वासने नकोत, निष्ठेच्या पोकळ गप्पा नकोत आंम्हाला विकास हवा आहे या भावनेतुन आणि या जिद्दीने मतदान करत मतदारांनी बोगस अशा निष्ठेला हद्दपार करण्याचा निर्णय मनापासून घेतला व मतदानाच्या दिवशी भरभरून मतदान करून तो दाखवून दिला आहे.

त्यामुळे आपला विजय हा या मतदार संघातील ऐतिहासिक विजय असेल असेही किरण सामंत यांनी नमुद केले.*

लांजा राजापूर साखरपा मतदार संघातील युवक महिला तसेच सुशिक्षित मतदारांनी पक्ष मतदान करून माझ्या पर्डात मतदान टाकले असल्याचे मला विश्वास आहे.या मतदार संघात माझ्या महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जीव ओतुन काम केले आहे.

त्या सगळयांचेही आपण मनापासून ऋणी असल्याचे नमुद करताना भविष्यात राजापूर मतदार संघातील जनतेच्या मनातील विकास आणि मतदार संघाचा विकासात्मक असा कायापालट झालेला असेल हा आपला शब्द नव्हे वचन आहे असेही किरण सामंत यांनी नमुद केले.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी