मुंबईसह महाराष्ट्रात गारवा; सांताक्रुझचा पारा 18 अंशांवर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबईसह महाराष्ट्रात गारवा; सांताक्रुझचा पारा 18 अंशांवर!

आंबा बागायतदार सुखावले

▪️मुबई-ठाण्यासह राज्यभरात गुरुवारी किमान तापमानात मोठी घसरण झाली आणि नागरिकांना गुलाबी थंडीची चाहूल लागली. मुंबईत सांताक्रुझमध्ये पारा 18 अंशांपर्यंत खाली आला. तापमानात सरासरीपेक्षा तीन अंशांची घट झाली. त्यामुळे गेले अनेक दिवस थंडीच्या प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना हुडहुडी भरली. राज्याच्या बहुतांश भागांत 11 ते 12 अंश किमान तापमान नोंद झाले. ग्रामीण भागात गारठा वाढला आहे.

▪️नोव्हेंबर संपत आला तरी मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात थंडी दाखल झालेली नाही. पूर्वेकडील वारे सक्रिय राहिल्याने थंडीची वाट अडली. त्यामुळे मागील आठवडाभर किमान तापमान 24 अंशांच्या आसपास राहिले होते. गुरुवारी सकाळी मात्र तापमानात अचानक मोठी घट झाली आणि मुंबईकर -ठाणेकरांनी हुडहुडी अनुभवली. सांताक्रुझमध्ये कमाल तापमानही खाली घसरले. ठाण्याच्या तापमानात 23 अंशांपर्यंत घट झाली. शेजारच्या पालघर जिह्यातही थंडीची तीव्रता वाढली आहे. डहाणूमध्ये 19 अंश किमान तापमान नोंद झाले. राज्याच्या ग्रामीण भागासह शहरी भागांत येत्या दिवसांत थंडीची तीव्रता वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

महाबळेश्वरमध्ये धुक्याची चादर 11 अंशसेल्सिअस पर्यंत तापमान

▪️महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर- पाचगणीचा पारा घसरला असून 11 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आल्याने थंडी वाढली आहे. पहाटेपासूनच अंगाला झोंबणारे वारे वाहत असल्याने सकाळी नऊपर्यंत अंगातून थंडी जात नाही. शहरासह घनदाट झाडी आणि पर्वतरांगांवर पहाटे व संध्याकाळी दाट धुक्याची चादर दिसून येत आहे. विशेषकरून महाबळेश्वर शहरात पहाटे 11 ते 12 अंश सेल्सिअसचे तापमान आढळून आले आहे. आता गुलाबी थंडीची अनुभूती घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

कुठे.. किती तापमान

▪️सांताक्रुझ – 18 अंश

▪️महाबळेश्वर – 11 अंश

▪️डहाणू – 19 अंश

▪️नाशिक – 12 अंश

▪️मालेगाव – 14 अंश

▪️पुणे – 12 अंश

▪️उदगीर – 13 अंश

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न  तळवली प्रतिनिधी (मंगेश जाधव)         ...
Read More
स्व. बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त कुटगिरी येथे महाआरोग्य शिबीर संपन्न 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन रत्नागिरी -...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे ‘ *राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त* ’ रूरल कम्युन्स, चिपळूण बचत गटातील महिलांना मार्गदर्शन

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा IES चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या विद्यार्थिनीने घडवला...
Read More
डोंबिवलीच्या जान्हवी कुलकर्णीची ऐतिहासिक कामगिरी; SSC परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत राज्यभर झळकली प्रतिभा

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न कॉलेजमधल्या जुन्या आठवणींना उजाळा आणि पुनर्भेटीला कटिबद्ध आबलोली (संदेश कदम) निसर्गरम्य परिसर,...
Read More
गुहागर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

*साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार "दिनकर सन्मान" सोहळा उत्साहात संपन्न   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : साहित्य, कला, पत्रकारिता, शिक्षण, समाजसेवा...
Read More
साहित्य, कला आणि समाजसेवेचा दिमाखदार “दिनकर सन्मान” सोहळा उत्साहात संपन्न

अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

*अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): दहावीच्या एस.एस.सी. परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर...
Read More
अंधेरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध व्यवसायांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद जनसुविधा योजनेतून रस्ता पूर्ण; लवकरच डांबरीकरणासाठी निधी देणार...
Read More
मासू येथे घाणातले टेप ते भाटलवाडी रस्त्याचे उद्घाटन उत्साहात संपन्न

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा!- वैभव नाईक    रविंद्र चव्हाण...
Read More
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर निलेश राणेंनी वडीलांना सांगून त्यांची भाजपमधून हकालपट्टी करून दाखवा- वैभव नइक!

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी, महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन   *प्रबोधनपर व्याख्याने, सत्कार सोहळा...
Read More
खेरशेत येथे १३ ते १५ मे रोजी,  महापुरुषांचा जयंती महोत्सव व बुध्द विहाराचा वर्धापन दिन

ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी

■ ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी....।* ■ समिर शिरवडकर-रत्नागिरी. राजापूर:- तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी अधिकारी...
Read More
ठेकेदारांचा तारणहार, बांधकाम चा प्रभारी,न ऐकून घेई तक्रारी