आधुनिक भारताचे निर्माते, विश्वरत्न, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
रत्नागिरी –रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक सतीश विष्णू शिवरकर यांनी मध्यरात्री केले अभिवादन
रत्नागिरी पुतळा परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मध्यरात्री एक वाजता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीश शिवरकर पुतळा परिसरात दाखल झाले. पोलिसांशी संवाद साधण्यापूर्वीच आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सलामी देऊन अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत पोलीस कर्मचारी होते.
वैचारिक अभिवादनाला मोठा प्रतिसाद
महामानवास अभिवादन करण्यासाठी जिल्ह्याच्या कोनाकोपऱ्यांतून अनुयायी रत्नागिरीत येत राहतात.















