सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन मंगळवारी शुभारंभ

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन मंगळवारी शुभारंभ

शौर्यपदकधारक तथा वीर नारी सत्कार समारंभाचे आयोजन

रत्नागिरी, दि.९ (जिमाका) : सशस्त्र सेना ध्वजदिन २०२४ निधी संकलन शुभारंभ व शौर्यपदकधारक तथा वीर नारी सत्कार समारंभ मंगळवार १० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला आहे.*
कार्यक्रमाला विशेष अतिथी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला आजी-माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, माजी सैनिक पत्नी, पाल्य यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी व सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी राजू शामराव सावंत यांनी केले आहे.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...