अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट; तालिबान सरकारच्या मंत्र्यासह १२ जण ठार; आत्मघाती हल्ल्याचा संशय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये भीषण स्फोट; तालिबान सरकारच्या मंत्र्यासह १२ जण ठार; आत्मघाती हल्ल्याचा संशय

काबूल– अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भीषण स्फोट झाला आहे. ज्यामध्ये तालिबानचे निर्वासित मंत्री खलील रहमान हक्कानी आणि त्यांच्या तीन अंगरक्षकांसह १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा दिला आहे. आज बुधवारी काबूलमधील निर्वासित मंत्रालयाच्या कंपाऊंडमध्ये हा स्फोट झाला. राजधानी काबूलमध्ये मंत्रालयाच्या आवारात स्फोट झाल्याने मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. हा स्फोट कोणी घडवून आणला याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीच्या आधारे हा आत्मघाती हल्ला मानला जात आहे. रिपोर्ट्सनुसार या स्फोटात हल्लेखोराचा देखील मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास असणारे अनेक लोक जखमी झाले आहेत.

आतापर्यंतच्या तपासात जे समोर आले आहे, त्यानुसार हा आत्मघाती हल्ला असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आत्मघाती हल्लेखोर मंत्रालयात कसा पोहोचला? याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही. खलील रहमान हक्कानी हे तालिबान सरकारमध्ये निर्वासित आणि स्थलांतर मंत्री होते. त्यांना ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबान सत्तेवर परतल्यानंतर कार्यवाहकच्या आधारावर ही जबाबदारी देण्यात आली होती. तालिबानचे गृहमंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे ते काका होते.

अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतात जन्मलेले हक्कानी हे पश्तूनांच्या जदरान जमातीचे होते. अफगाण युद्धादरम्यान खलील रहमान हक्कानी यांच्यावर आंतरराष्ट्रीय निधी उभारण्याची जबाबदारी होती. ते हक्कानी नेटवर्कचे प्रमुख नेते होते. दरम्यान, ते गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानसोबत काम करत होते. त्याआधी हक्कानी यांचा काहीकाळ अल-कायदा संघटनेशीही संबंध होता. २००२ मध्ये हक्कानी यांना पक्तिया प्रांतात अल-कायदा संघटना मजबूत करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.

खलील रहमान हक्कानी हे तालिबानचे अंतर्गत मंत्री सिराजुद्दीन हक्कानी यांचे काका आणि हक्कानी नेटवर्कमधील एक प्रमुख व्यक्ती होते. ऑगस्ट 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर 7 सप्टेंबर 2021 रोजी निर्वासितांचे कार्यवाहक मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांच्यात सध्या संघर्ष सुरु आहे. त्यामुळे हा हल्ला इसिसकडून केला गेला असल्याची प्राथमिक माहिती आहे. पण या प्रकरणात कोणत्याही संघटनेने अद्याप जबाबदारी स्वीकारलेली नाही. इस्लामिक स्टेटने वारंवार असे हल्ले केले आहेत, ज्यामुळे अलीकडील काही महिन्यांत तालिबान सरकारसोबत त्यांचा तणाव वाढला आहे.

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प एसटी महामंडळाचा...
Read More
ST Bus Green Revolution: २०४७ पर्यंत एसटीचा ताफा १००% ई-बसेसमध्ये रूपांतरित होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा संकल्प

शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

🌏 शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ वनविभागाची तातडीची कारवाई; अज्ञात शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू संगमेश्वर-...
Read More
शिकारीच्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू; संगमेश्वरातील तुरळ परिसरात खळबळ

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णकंठ हरपला; वयाच्या ८९व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास मुंबई...
Read More
स्वरगंगेचा अस्त! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूरकर यांचे निधन

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार मुंबई :...
Read More
IPL मध्ये RCBचा दमदार विजय; मुंबई इंडियन्सवर 18 धावांनी मात वानखेडेवरील हाय-स्कोरिंग सामन्यात RCBची सरशी; प्लेऑफची लढत रंगतदार

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट लोणीकंद परिसरातील घटना; तरुणी मुख्य सूत्रधार, ८ आरोपी अटकेत पुणे :पुणे-अहिल्यानगर...
Read More
पुण्यात भररस्त्यात तरुणाचं अपहरण; जबरदस्तीच्या लग्नासाठी रचला धक्कादायक कट

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप मेरीटाईम बोर्ड व महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह;...
Read More
दाभोळ खाडीत मोठा गौडबंगाल? विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळावा म्हणून बेकायदा भरावाचा आरोप

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद! कोकण दौऱ्यावर असताना मंत्र्यांनी केली एसटी...
Read More
संगमेश्वर बसस्थानकात प्रवाशांना सुखद धक्का; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रवाशांसोबत लुटला वडापावचा आस्वाद!

चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

‘चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपाच्या...
Read More
चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीशी माझा काहीही संबंध नाही; बदनामी करू नका’ – उदय सामंत

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ बँक ऑफ इंडियाच्या सॅलरी अकाऊंट विमा योजनेतून परवडी कुटुंबाला...
Read More
विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वारसांना 23.84 लाखांचा विमा लाभ

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न

तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा इंटरनॅशनल पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘तितिक्षा...
Read More
तितिक्षा कलाकाव्य संध्या व यशवंत पुरस्कार सोहळा संपन्न