नाना पटोले यांनी केली, कांग्रेस प्रदेशाक्षपद सोडण्याची तयारी.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

नाना पटोले यांनी केली, कांग्रेस प्रदेशाक्षपद सोडण्याची तयारी.

चार वर्ष झाले पदमुक्त करा- नाना पटोले यांचे खरगे यांना पत्र.

नागपूर : —काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना ई-मेल करून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या दारूण पराभवाच्या पार्श्वभूमीवर पटोले यांनी पक्षाकडे ही विनंती केली आहे.

पटोले यांनी चार वर्षांपासून आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत आहे. आता पदमुक्त करण्यात यावे, अशी विनंती करणारा ई-मेल राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठवला आहे. या वृत्ताला प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुले लोंढे यांनी दुजोरा दिला आहे.

विधान निवडणुकीचे निकाल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा होती. परंतु त्यांनी ती फेटाळली होती. त्यांनी दिल्लीत जावून पक्षश्रेष्ठींची भेट २४ नोव्हेंबरला घेतली होती. त्यांना पक्षश्रेष्ठींकडून अभय मिळाले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी ई-मेल द्वारे पदमुक्त करण्याची विनंती केली. परंतु राजीनामा दिलेला नाही, असा दावा करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी केवळ १६ जागा काँग्रेसला मिळाल्या. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर, बाळासाहेब थोरात, माणिकराव ठाकरे या सारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव झालेला आहे. ते स्वत: देखील अत्यल्प मतांनी विजयी झाले. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पक्षातून टीका होऊ लागली.

यासर्वाची नैतिक जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतील, अशी चर्चा होती. परंतु त्यांनी राजीनामा दिला नाही. आता अचानक ई-मेलद्वारे पदमुक्त करण्याची विनंती करून पुन्हा एकदा पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवला आहे.

पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर विधानसभा निवडणुकीतील सर्वात मोठा पराभव झाला. यापूर्वी त्यांच्या काळात काँग्रेसने काही स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकात विजय मिळवला. तसेच पदवीधर, शिक्षण मतदारसंघातही चांगली कामगिरी केली. त्याचा सर्वोत्तम बिंदू म्हणजे लोकसभेत घवघवशीत मिळाले. त्यामुळे पटोले यांची प्रसंशा झाली. त्यांचे पक्षातील विरोधक देखील शांत होते.

पण, आता पक्षातील विरोधक सक्रिय झाले आहेत. पक्षातून त्यांच्या नेतृत्व गुणांविषयी आणि कार्य पद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे. त्यामुळे पटोले यांच्यावर पद सोडण्याचा दबाब निर्माण झाला आहे. मात्र, त्यांनी राजीनामा न देता पक्षश्रेष्ठींवर त्याबाबतचा निर्णय सोडून दिला आहे.

यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पटोले यांनी पदमुक्त करण्याचा ई-मेल केल्याचे सांगितले. तसेच हा राजीनामा नसल्याचेही स्पष्ट केले.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

■ ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई ■ २७ मार्च ला दाखल केला होता चौकशी अहवाल ■...
Read More
ताम्हणे पहिलीवाडी अनधिकृत उत्खनन व जिलेटीन ब्लास्टिंग प्रकरणी कारवाई

देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

“देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय” लांजा- (जितेंद्र चव्हाण).राजापूर तालुक्याच्या विकासासाठी...
Read More
देशातील पहिले जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट लांज्यात; आमदार किरण सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा पुणे (गुरुदत्त वाकदेकर): आत्मसिद्ध मिशन आणि विश्व मराठी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने...
Read More
पुण्यात १० एप्रिल रोजी ‘यशप्रतिभा गौरव पुरस्कार’ सोहळा

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६- कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच,...
Read More
नाशिकमध्ये कलावंत पुरस्कार सोहळा २०२६-  कु. अजया अजित मुळीक यांना राज्यस्तरीय बाल कलावंत पुरस्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय 'ब्लॅक बेल्ट' परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या यशाने लांजाचा नावलौकिक; ७...
Read More
लांजाच्या खेळाडूंची राष्ट्रीय ‘ब्लॅक बेल्ट’ परीक्षेत बाजी; आमदार किरण सामंत यांच्याकडून विशेष सत्कार

राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

■ राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश ■ अध्याप चौकशी न...
Read More
राजापूर तालुक्यात उत्खननाला तहसीलदार यांचे अभय,प्रकरणी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे चौकशी चे आदेश

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे...
Read More
टिम डेव्हिडचा तडाखेबाज झंझावात; आरसीबीचा चेन्नईवर ४३ धावांनी दणदणीत विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): राजीव गांधी आंतरराष्ट्रीय...
Read More
पंतची परिपक्व खेळी, शमीचा टर्निंग पॉइंट स्पेल; लखनौचा हैदराबादवर ५ गडी राखून दमदार विजय

पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

*पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ *२६वे कविसंमेलन दादरमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न* मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :...
Read More
पुस्तकविश्व, कविता आणि मधु मंगेश कर्णिक यांच्या साहित्याचा सुरेल मिलाफ

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा