तळवली कनिष्ठ महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ उत्साहात साजरा….

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

तळवली कनिष्ठ महाविद्यालयात ‘ट्रॅडिशनल डे’ उत्साहात साजरा….

तळवली (मंगेश जाधव)…..

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली. ता. गुहागर जि. रत्नागिरी येथील विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक सण-ऊत्सव करून ‘ट्रॅडिशनल डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला.

येथील विद्यार्थी प्रत्येक वर्षी ट्रॅडिशनल डे साजरा करतात. त्याप्रमाणे यावेळीही इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.विभाग प्रमुख प्रा.अमोल जड्याळ सर यांनी या ‘ट्रॅडिशनल डे’ चे सुयोग्य नियोजन करुन विद्यार्थ्यांचे गट तयार करून त्या-त्या गटाचे प्रमुख नेमून त्याची संपूर्ण जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपवली होती.

यामध्ये भारतीय संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती व विशेष करून कोकणच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. वारकरी दिंडी, कोकणातील शिमगोत्सव, गणेश उत्सव,पारंपरिक लग्न सोहळा या सारख्या* *सण-ऊत्सवाचे आयोजन केले होते. वारकरी दिंडीमध्ये टाळ, मृदंग, वीणा या वाद्यांचा समावेश होता.ही सर्व वाद्ये विद्यार्थी स्वतः वाजवीत होते. विद्यार्थीनी डोक्यावर तुळस घेऊन वारीमध्ये सहभागी झाली होती. वारकरी रिंगणही केले होते.विशूष करून वारक-यांची वेशभूषा करूनच सर्व विद्यार्थी यात सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे कोकणातील महत्त्वाचा सण म्हणजे शिमगोत्सव.या मध्ये विद्यार्थ्यांनी पालखी आणली होती.पालखीच्या आगमनानंतर,मोठयाभक्ती भावाने पालखीची पुजा केली.पालखीही नाचवली त्यात विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या.तसेच गणेशोत्सव साजरा केला…मोठ्या भक्तीभावाने गणपतीचे आगमन झाले,गणपतीची प्रतिष्ठापना केली.गणपतीची आरती केली.त्यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्न सोहळ्याला फार महत्त्व आहे. त्याप्रमाणे वधू-वरांना हळद लावणे, त्यांचे स्वागत करणे,पुष्पहार अर्पण करणे,अक्षता टाकणे,मंगळसूत्र घालणे इत्यादी विधी पारंपरिक पद्धतीने पार पडले. या मध्ये काहीजण वधूपक्षा कडून तर काहीजण वर पक्षाकडून सहभागी झालेले दिसत होते.या लग्न सोहळ्यात सर्व विद्यार्थी मोठ्या आनंदात सहभागी झाले होते.*

*वरील सर्व सण-ऊत्सव मोठ्या भक्तीभावाने, पारंपरिक पद्धतीने, सर्व रीतीरिवाजांप्रमाणे साजरे केल्यामुळे महाविद्यालय परिसरात भक्तीमय, मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.*

*तळवली कनिष्ठ महाविद्यालयात साजरा केलेल्या ‘ट्रॅडिशनल डे’ अतिशय सुंदर नियोजन व आयोजन केले होते. सहभागी विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वहात होता.या विद्यार्थ्यांना प्रा. जड्याळ सर, प्रा. जड्याळ मॅडम, प्रा.आयरे मॅडम व प्रा. सावंत मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. हे सर्व कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडल्या बद्दल सहभागी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी जेष्ठ शिक्षक श्री.देवरुखकर सर,कला शिक्षक श्री.श्रीनाथ कुळे सर हेही उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले.शेवटी प्रा. जड्याळ सर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह