लोकसभेत सादर होणार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक; सर्व पक्षांकडून खासदारांना व्हीप!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मोदी सरकारची परीक्षा! लोकसभेत सादर होणार ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक; सर्व पक्षांकडून खासदारांना व्हीप!

दिल्ली – गेल्या वर्षभरापासून चर्चेत असणारे एक देश एक निवडणूक विधेयक मंगळवारी लोकसभेत सादर केले जाणार आहे.

. यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी आपल्या खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. सर्व राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे.

एक देश एक निवडणूक विधेयक म्हणून ओळखले जाणारे १२९ वे दुरुस्ती विधेयक, २०२४ हे केंद्रीय कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल सादर करतील, असे लोकसभेच्या अजेंड्यामध्ये म्हटले आहे.

*कायदा मंत्री मांडणार विधेयक*

गेल्या आठवड्यात झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकसभा तसेच राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आज केंद्रीय कायदा व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल हे विधेयक लोकसभेत मांडणार आहेत.

गुरुवारी, मंत्रिमंडळाने संविधान (१२० सुधारणा) विधेयक, २०२४, व केंद्रशासित प्रदेश कायदे (दुरुस्ती विधेयक), २०२४ मंजूर केले. त्यानंतर ही विधेयके शुक्रवारी संध्याकाळी खासदारांना वितरित करण्यात आली होती. ही विधेयके पुढील कार्यवाहीसाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाऊ शकतात.

One nation one election

*माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली समिती*

माजी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीच्या शिफारशींनुसार या विधेयकांचा मसुदा तयार करण्यात आला आहे.

या उच्चस्तरीय समितीची नियुक्ती कायदा मंत्रालयाने २ सप्टेंबर २०२३ रोजी एक देश एक निवडणुकीचा मार्ग आणि सुधारणा सुचवण्यासाठी केली होती.

*३२ पक्षांचा पाठिंबा*

दरम्यान माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या समितीकडे एक देश एक निवडणूक या संकल्पनेला आतापर्यंत ३२ पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहेत.

तर, १५ पक्षांनी याला विरोध केला आहे. दरम्यान एक देश एक निवडणूक या संकल्पनेला पाठिंबा देणारे एक तर भाजपाचे मित्रपक्ष आहेत किंवा भाजपाच्या जवळचे. या संकल्पनेला विरोध करणारे १५ पक्ष एनडीएच्या बाहेरील आहेत.

जे काँग्रेससह विविध राज्यांमध्ये सत्तेत आहेत, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

*…तर विधेयक नामंजूर होईल*

एक देश एक निवडणूक विधेयक मंजूर करुन घेण्यासाठी सरकारला ३६२ मते किंवा उपस्थित आणि मतदान करणाऱ्या दोन तृतीयांश खासदारांचा पाठिंबा लागणार आहे.

या विधेयकाच्या मतदानाच्या दिवशी १०० हून अधिक खासदार अनुपस्थित आणि ४३९ खासदारांनी उपस्थित राहून मतदान केले तरच मोदी सरकार २९३ मतांच्या पाठिंब्याने बहुमत जिंकू शकेल.

याचा अर्थ असा आहे की, सरकारने याच्या विरोधात असलेल्या पक्षांना या मुद्द्यावर आपल्याकडे वळवत नाही तोपर्यंत हे विधेयक संसदेत मंजूर होऊ शकणार नाही.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...
Read More
रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम! रत्नागिरी :- निलेश रहाटे वाटद मिरवणे ग्रा. पं मधील गेली 3...
Read More
बांधकाम विभागाची कारवाई; ठेकेदार नोंदणी रद्द, पण प्रश्न कायम!

शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला

शृंगारतळीत 'अवेरे ज्ञान प्रबोधिनी'चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला गुहागर तालुक्यातील स्थानिकांच्या रोजगारासाठी दशभुजा सोशल...
Read More
शृंगारतळीत ‘अवेरे ज्ञान प्रबोधिनी’चे थाटात उद्घाटन; सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला