तळवली येथे आज पासुन प्रीमिअर लीगचे आयोजन.
गुहागर (आशिष कर्देकर)….
गुहागर तालुक्यातील हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज यांच्या वतीने गुरव प्रीमियर लीग पर्व 4 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्या शनिवार दि.28 व रविवार दि.29 रोजी तळवली डावलवाडी येथे करण्यात आले आहे.
सलग चौथ्या वर्षी ही स्पर्धा हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर यांच्यावतीने आयोजित करण्यात आली असून यावर्षी श्री सिद्धिविनायक क्रीडांगण तळवली येथे ही स्पर्धा पार पडणार आहे.यामध्ये शनिवारी 28 रोजी सकाळी 8 वाजता स्पर्धेचा उद्घाटन समारंभ व साखळी सामने तसेच रविवारी 29 रोजी साखळी सामने व अंतिम सामना पार पडणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्यास रोख रक्कम व आकर्षक चषक ,उपविजेत्यास रोख रक्कम व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे.तर इतर वैयक्तिक पारितोषिके देखील देण्यात येणार आहेत.तरी या स्पर्धेचा क्रिकेटप्रेमींनी लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू भाविक गुरव ज्ञाती समाज गुहागर तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.