मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेवरील अतिक्रमणावर लवकरच हातोडा
रत्नागिरी : मिरकरवड्यात सतत बेकायदेशररित्या बांधकामे सुरूच आहेत.
मिरकरवाडा प्राधिकरणाच्या जागेमध्ये असलेल्या अनधिकृत बांधकामांचा तीन निवृत्त महसूल अधिकाऱ्यांमार्फत सर्व्हे होणार आहे. किती कच्ची, पक्की बांधकामे आहेत, अन्य जागांवर कोणी अतिक्रमण केले आहे, याचा अहवाल प्राधिकरणाला देऊन प्राधिकरणाची जागा रिकामी केली जाणार आहे. लवकरच या सर्व्हेचा अहवाला आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.















