साखरीनाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस द्या

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

साखरीनाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस द्या

रत्नागिरी : ( वार्ताहर) अतिक्रमणमुक्त मिरकरवाडा मत्स्य बंदरावर प्राधान्याने संरक्षण भिंत बांधण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर मच्छिमारांसाठी निवारा शेड, गिअर शेड, प्रशासकीय कार्यालय, उपहारगृह, प्रसाधनगृह अशी विकासकामे करण्याच्या सूचना देतानाच साखरीनाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवर अतिक्रमण असल्यास, ती हटविण्याबाबत नोटीस द्याव्यात, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंत्री श्री. राणे यांनी ८ फेब्रुवारी रोजी बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मत्स्यव्यवसाय विभागाचे कोकण प्रादेशिक उपायुक्त नागनाथ भादोले, सहायक आयुक्त सागर कुवेसकर, मत्स्यविकास अधिकारी आनंद पालव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रातांधिकारी जीवन देसाई आदी उपस्थित होते. 

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री. राणे यांनी मिरकरवाडा अतिक्रमण मुक्त केल्याबद्दल मत्स्यव्यवसाय विभाग आणि पोलीस विभागाचे सर्वप्रथम विशेष अभिनंदन केले. ते म्हणाले, अतिक्रमणमुक्त जागेवर मच्छिमारांच्या सुविधांसाठी शासनाच्या ३९ कोटी निधीतून विकासात्मक कामे करण्यावर भर द्या. प्राधान्याने सरंक्षण भिंत बांधावी. ज्या औद्योगिक प्रकल्पातून तसेच अन्य मार्गाने येणाऱ्या सांडपाण्याबाबत संबंधितांना नोटीस द्यावी. मिरकरवाडा अतिक्रमण निर्मूलन पॅर्टनप्रमाणेच साखरीनाटेसह रत्नागिरीच्या किनारपट्टीवर अशी अतिक्रमणे असतील, तर संबंधितांना स्वत:हून ती काढून घेण्याबाबत नोटीस द्यावी. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डानेही अतिक्रमण काढण्याबाबत कार्यवाही करावी.

अतिक्रमण निर्मूलन झाल्याने विकासाचा मार्ग मोठा झाला आहे. केंद्रीय अंदाजपत्रकात मत्स्योत्पादन वाढीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याबाबत अभ्यास करावा. मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याबाबत कार्यक्रम हाती घ्यावेत. ४१ तलावांच्या बाबत विभागाने अभ्यास करून अहवाल द्यावा. मत्स्योत्पादन वाढीबाबत आंध्रप्रदेशच्या धर्तीवर काय करता येईल, यावर देखील विचार करावा, असेही ते म्हणाले. उपायुक्त श्री. भादोले यांनी यावेळी सागरी मत्स्यउत्पादन वाढविण्यासाठी उपाययोजना, मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प टप्पा क्र.१ मध्ये घेण्यात आलेली कामे, टप्पा क्र.२ मध्ये करण्यात येणारी कामे याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच नियमांचा भंग करणाऱ्या स्थानिक नौकांकडून ४ लाख ८० हजार रुपयांची वसुली केल्याबाबत आणि परप्रांतीय नौकेला ११ लाख रुपये दंडाची नोटीस बजाविल्याबाबतदेखील माहिती दिली.

साखरीनाटेसह अन्य सागरी किनाऱ्यांवरील अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस द्या

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर मुंबई: गॅस सिलिंडरचे वाढते दर...
Read More
LPG संकट आणि महागाईवर फुंकर! राज्यात रेशनवर पुन्हा मिळणार रॉकेल; ३७ लाख लिटरचा कोटा मंजूर

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन;...
Read More
चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष: समतामूलक भारतासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाड येथे ५५ कोटी ८० लाखांच्या विकासकामांचे भूमीपूजन; ९८ पीडित वारसांना शासकीय नोकरीचे आदेश सुपूर्द

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा   उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष बळकटी, संघटनात्मक बदल...
Read More
मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांची बैठक; आगामी रणनीतीवर सविस्तर चर्चा

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न *खुणा काढणे’ कार्यक्रमाकडे भाविकांचा ओघ आबलोली (संदेश कदम) गुहागर तालुक्यातील जामसूद गावात...
Read More
गुहागरमधील जामसूद येथे सोनसाळवी देवीचा शिमगोत्सव उत्साहात संपन्न

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक नाशिक: नाशिकमध्ये गाजत असलेले अशोक खरात लैंगिक शोषण...
Read More
अशोक खरात प्रकरण: तृप्ती देसाईंवर कोट्यवधींच्या तडजोडीचा खळबळजनक आरोप; रुपाली पाटील-ठोंबरे आक्रमक

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान एनईईटी-एसएसमध्ये अव्वल यश, कठोर परिश्रम आणि...
Read More
डॉ. मरियम आफिफा अन्सारी यांची ऐतिहासिक कामगिरी; भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन बनण्याचा मान

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार रत्नागिरी :- निलेश रहाटे रत्नागिरी तालुक्यातील वाटद नं.१ येथील जिल्हा परिषद...
Read More
वाढदिवसानिमित्त दरवर्षी वेगळा उपक्रम; जि.प. शाळेतील शिक्षकांचा प्रेरणादायी पुढाकार

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी 200 पैकी 148 गुणांसह यश, नासा भेट शिक्षक...
Read More
रत्नागिरीतील शिक्षक संजय दळवी यशस्वी; केंद्रप्रमुख परीक्षेत 30वा रॅंक, टीईटीमध्येही उल्लेखनीय कामगिरी

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, 'सिनेस्टाईल' थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड सातारा: सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष...
Read More
सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा! मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला, ‘सिनेस्टाईल’ थरारानंतर प्रिया शिंदे यांची अध्यक्षपदी निवड

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा? राजकीय वर्तुळात मोठी खळबळ मुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर...