मनसे तालुका गुहागर या पक्षाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त चाकरमान्यांसाठी मोफत एस. टी. ची सेवा..!

मनसे तालुका गुहागर या पक्षाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त चाकरमान्यांसाठी मोफत एस. टी. ची सेवा..!

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम..

गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष श्री. प्रमोद गांधी यांचा स्तुत्य उपक्रम.. मोफत ST सुविधा

!

आबलोली  (संदेश कदम)-  महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी गणेशोत्सवा निमित्त चाकरमान्यांना परतीच्या प्रवासासाठी मोफत एस.टी. बस सेवा उपलब्ध करुन दिली सदरची एस.टी. कौंढर काळसूर येथून सोडण्यात आली. गुहागर तालुक्यातील अनेक प्रवाशांनी या मोफत बसचा लाभ सदरची बस सेवा गुहागर तालुक्यातील विविध ठिकाणाहून गुहागर-चिपळूण-ठाणे-विरार अशी ही बस सेवा उपलब्ध करण्यात आली असून या मोफत एस.टी.चा गणेश भक्तांनी लाभ घेतला. गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून बस सोडण्यात आली. यावेळी एस. टी. चालक यांचाही सत्कार करण्यात आला. सर्व प्रवाशांच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर,कौंढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, मुंढर शाखा अध्यक्ष सुजित गांधी यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या वतीने गणेश भक्तांसाठी गावी येण्यासाठी सुद्धा मोफत एस. टी.बस सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या मोफत बस सेवेचा अनेक गणेश भक्तानी लाभ घेतला. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेश भक्तांसाठी मोफत बस सेवा उपलब्ध केल्याने गणेश भक्तानी प्रमोद गांधी यांचे विशेष आभार मानले तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका गुहागर या राजकीय पक्षाचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे आणि सामाजिक कार्याचे गुहागर तालुक्यातून सर्वच स्तरामधून कौतूक करण्यात येत आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें