मनोज जरांगे- पाटील यांचा सरकारला पुन्हा इशारा….

माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. 2024 ला तुमचा भुगा करणार- मनोज जरांगे पाटील.

वडीगोद्री : मी जीवघेणा प्रवास सुरू केलाय, तुम्ही आरक्षण नाही दिले ना, मग तुमचे बारा-तेरा वाजल्याशिवाय सोडणार नाही. माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही. मराठ्यांचे पोरं सोपे नाही. 2024 ला तुमचा भुगा करणार, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकारला दिला आहे.

Manoj Jarange-patil….

अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरूवात केली असून सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी, मराठ्याना ओबीसी तून आरक्षण मिळावे या मागणी साठी त्यांचे हे मुक्ती संग्राम दिनी सहावे उपोषण आहे.

आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, महायुती असो महाविकास आघाडी असो तिकडे खड्ड्यात जा; पडा नाहीतर निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा, आम्हाला काहीही देणेघेणे नाही. सरकारशी बोलण्यासाठी त्यांनी यावे म्हणून आंदोलन नाही करत केव्हाच आपल्या ताकदीवर आणि समाजावर विश्वास आहे. मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही.असे ही ते म्हणाले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें