विक्रांत जाधव यांनी घेतली मा. उप मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट…

आ. भास्कर जाधव यांचे पुत्र विक्रांत जाधव यांनी आज मा.अजित पवार साहेब यांची भेट घेतली

चिपळूण : (वार्ताहर ) कोकणातील चिपळूण येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा होता. या दौऱ्यात ठाकरे गटाचे नेते आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांनी अजित दादांची भेट घेतली. या भेटीनंतर अनेक चर्चा केल्या जात आहेत. विक्रांत जाधव यांचे नाव विधानसभेसाठी इच्छुक म्हणून चर्चेत आहे. राज्यात विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत आणि आता अशातच विक्रांत जाधव यांनी अजितदादा पवार यांची घेतलेली भेट हा अवघ्या कोकणात चर्चेचा विषय ठरला आहे.:

भेटीचा राजकीय हेतू नव्हता… विक्रांत जाधव यांचं स्पष्टीकरण.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे माझ्या निवासस्थानापासून अगदी ५०० मीटर अंतरावर आले होते. ते राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी मला ५६ कोटी रुपयांचा निधी दिला होता. तेव्हा आमचे महाविकास आघाडीचे सरकार होते. अजितदादा तेव्हाही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या शिस्तीप्रमाणे मी त्यांची भेट घेतली आहे. यामध्ये कोणताही राजकीय हेतू नव्हता असे विक्रांत जाधव यांनी स्पष्ट केले आहे.

तर चिपळूणला उद्या येणाऱ्या  मा.शरद पवार साहेब यांची ही आपण भेट घेणार आहोत असे ही त्यांनी सांगितले.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें