अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊता

अक्षय शिंदेच्या तोंडावर बुरखा अन् हातही बांधलेले, मग त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला; संजय राऊतांच्या पोस्टने सस्पेन्स वाढला.

मुंबई – बदलापूर अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर करण्यात आला आहे. वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्याने विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. संजय राऊत यांनी या एन्काउंटर प्रकरणावरून प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत.

शंका घ्यावी असाच प्रकार आहे. एखादा अपवाद वगळता इतर एन्काउंटर हे खरे नसतात. अत्याचाराची घटना घडलेली तेव्हा बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या हातात द्या, ही मागणी तेव्हा जनतेची होती. तेव्हा गृहमंत्री अस करता येणार नाही म्हणून सांगत होते. ज्याचा एन्काउंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे, अशी टीका राऊत यांनी केली.:

बदलापूर लैंगिक अत्याचार (Badlapur Case) प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde Encounter) याचा सोमवारी मुंब्रा परिसरात झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अक्षयने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेऊन एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा मृत्यू झाला.

Prachi Sutar
Author: Prachi Sutar

Prachi Sutar - Ratnagiri. *Digital media creators* Office clark.PR.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें