शिवसेना शिंदे गटाचे रत्नागिरी शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र!

ratnagirivartahar

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेना शिंदे गटाचे रत्नागिरी शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांचे पोलिस अधीक्षकांना पत्र!

  रत्नागिरी -(वार्ताहर) विजया दशमीच्या एक दिवस अगोदर पोलीस प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने कोकण नगर येथून काढण्यात आलेल्या संचलना दरम्यान,संचलनाचा मार्ग रोखून धरून,तिथल्या स्थानिक मुस्लीम समाजाच्या लोकांनी विरोधी घोषणा दिल्याने एकच खळबळ माजली होती.

हिंदू,मुस्लिम समाजात निर्माण झालेला जातीय तेढ पोलिसांनी चांगल्या पध्दतीने दूर करत दोन्ही गटांना शांत केले होते.

ही परीस्थिती हाताळताना पोलिसांनी लाठीचार्ज केला असं शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांच म्हणणं असून या लाठीचार्ज ची सखोल चौकशी करावी व समंधीत अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशा मागणीच पत्र त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना दिले आहे.या प्रताची तातडीने दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी, रत्नागिरी शहर पोलिस निरीक्षक तोरसकर यांना सदर घटनेची चौकशी पूर्ण होई पर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

तोरसकर यांच्याकडे असलेला पोलीस निरीक्षक पदाचा चार्ज जिल्ह्यात नवीन रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक शिवलकर यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]