गुहागर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्यासाठी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सरसावले..!

गुहागर विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलविण्यासाठी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सरसावले..!

आबलोली (संदेश कदम).

भारतीय जनता पार्टी गुहागर तालुक्याच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची बैठक शृंगारतळी येथे भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रशांत शिरगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
जनसंघापासून काम करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा राहिलेला भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या गुहागर विधानसभा मतदारसंघाचे २००९ पूर्वीचे गतवैभव पुन्हा एकदा मिळविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. कै डॉ तात्यासाहेब नातू यांच्या छत्राखाली काम करताना तहान भूक विसरून काम करणारा हाडाचा त्यागी कार्यकर्ता म्हणून आमची ओळख असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचे कौशल्य आम्हाला अवगत आहे त्यामुळे १४ वर्षांनी गुहागर विधानसभा मतदारसंघावर आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे माध्यमातून भाजपाचा झेंडा फडकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार यावेळी जेष्ठ कार्यकर्त्यांनी व्यक्त करत जुने आणि नवीन कार्यकर्ते एकमताने एक दिलाने जिद्दीने आत्मविश्वासाने या निवडणूकीच्या रणसंग्रामात उतरले आहेत. यावेळी गुहागर विधानसभा मतदारसंघात जनसंघापासून काम करणारे भाजपचे बुजुर्ग कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

plz Join whatsup group ????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें