देवरूख- म्हसवड लालपरी ची प्रवासी वाहतूक सुरू…

देवरुख-म्हसवड मार्गावर दिवाळी स्पेशल बस सेवा सुरू प्रवासी वर्गात उत्साह..

देवरूख – (वार्ताहर) – दि. २५ ऑक्टोबर पासून देवरुख -म्हसवड मार्गावर देवरुख आगार मार्फत खास दिवाळी स्पेशल बस सेवा सुरू होत आहे. देवरुखहून सकाळी ६ वाजता सुरू होणारी बस म्हसवडला दुपारी १२:३० वाजता पोहोचेल, तर म्हसवडहून दुपारी २वाजता सुटणारी बस देवरुखला रात्री ८:३९ वाजता परत येईल.

_ही बस साखरपा,मलकापूर, कोकरूड,कराड,पुसेसावळी, वडूज,दहिवडी आणि गोंदवले या मार्गे धावणार आहे. देवरुखहून सुटलेली बस मलकापूरला ६ वाजता, कराडला १० वाजता, गोंदवलेला १२ वाजता आणि म्हसवडला १२;३० वाजता पोहोचेल.म्हसवडहून सुटलेल्या बसचा प्रवास गोंदवलेला २:३० वाजता, कराडला ४;३० वाजता, मलकापूरला ६;३० वाजता होत रात्री ८;३० वाजता देवरुखला समाप्त होईल.

 

या बस सेवेमुळे श्री देवी सोळजाई, श्री देव मार्लेश्वर, श्री देवी यमाई, ब्रह्मचैतन्य महाराज,आणि श्री देव सिद्धनाथ यांचे दर्शन घेणाऱ्या भाविकांसह, माहेरवाशीण, विद्यार्थी, नोकरदार आणि व्यापारी वर्गाला प्रवासाची मोठी सोय होणार आहे.

_सर्वांनी या बससेवेचा लाभ घेऊन आनंददायी आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन देवरुख आगार वतीने करण्यात येत आहे._

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें