महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक; दिल्लीत काहीतरी मोठं घडतंय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; महाबैठकीआधीच एकनाथ शिंदे-अमित शाह यांची बैठक; दिल्लीत काहीतरी मोठं घडतंय?

नवी दिल्ली- महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अतिशय मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होऊन 5 दिवस झाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं आहे. असं असलं तरीही महायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी पेच निर्माण झालेला बघायला मिळाला. अखेर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला. पण शिंदेंना गृहखातं हवं असल्याची चर्चा आहे. सत्ता स्थापनेच्या पेचावर तोडगा काढण्यासाठी आज दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी आज महायुतीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे दिल्लीतील हालचालींना वेग आला आहे.

अमित शाह यांच्या निवासस्थानी आज रात्री बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार आज सकाळीच दिल्लीत दाखल झाले. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज दुपारी दिल्लीत दाखल झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे.

या सर्व घडामोडी सुरु असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट आणणारी घटना घडताना दिसली. देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची एकीकडे बैठक सुरु असताना रात्रीच्या सुमारास एकनाथ शिंदे हे दिल्लीत दाखल झाले. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळाहून थेट अमित शाह यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी अमित शाह यांच्या निवासस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दाखल झाले होते. नड्डा आणि शाह यांच्यात बैठक सुरु होती. या दरम्यान एकनाथ शिंदे तिथे पोहोचले.

यानंतर अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. या बैठकीनंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत एकत्र बैठक होणार असल्याची माहिती आहे. महायुतीच्या आजच्या बैठकीत महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. तसेच गृहखात कुणाला द्यायचं? याबाबतही मोठा खुलासा होणार आहे. आजच्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. कोणत्या पक्षाला कोणत्या खात्याचं मंत्रिपद द्यावं, ते ठरणार आहे. त्यामुळे या खातेवाटपाकडे आणि मुख्यमंत्रीपदासाठी कुणाचं नाव निश्चित होतं, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे

???? watsup group ????????https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]