चिपळूणमधील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडु चिन्मयी ढगळे हिची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

चिपळूणमधील डीबीजे कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडु चिन्मयी ढगळे हिची महाराष्ट्र कबड्डी संघात निवड

 

चिपळूण— राष्ट्रीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा १९वर्षा आतील मुले/मुली दि ०६ ते ११ डिसेंबर २०२४ रोजी भीम स्टेडीयम, भिवानी, हरयाणा येथे होणा-या स्पर्धासाठी डी. बी. जे कनिष्ठ महाविद्यालयाची खेळाडु कु. चिन्मयी ऋतुजा-हृषिकेश ढगळे हिची महाराष्ट्र संघात निवड झाली. चिन्मयीचा कबड्डी स्थानिक संघ स्वराज्य स्पोर्टस ॲकेडमी, चिपळुण हा आहे.

 

चिन्मयीला लहानपणापासूनच कबड्डी खेळाची आवड असल्यामुळेच तिने अनेक स्पर्धा आपल्या खेळाने गाजवल्या आहेत. या यशामागे स्वराज्य स्पोर्टस ॲकेडमीचे प्रशिक्षक श्री व सौ श्रध्दा योगेश हुंबरे, श्री व सौ राखी अभिजीत सकपाळ, पवार महाविद्यालयाच्या क्रीडा शिक्षका अंकिता मिं. पवार, युनायटेड हायस्कुलचे क्रीडा शिक्षक समिर कालेकर, राष्ट्रीय प्रशिक्षक संतोष शिर्के, कुलभुषण कुलकर्णी, डि.बी.जे महा.चेअरमन मंगेश तांबे, उल्हास मोहिते, कांबळे, बंटी सकपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कबड्डी क्षेत्रातील सर्व मान्यवराकडुंन तिचे कौतुक व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]