करेल गावी दिनांक १४ डिसेंबर २०२४ रोजी श्री दत्त जयंती उत्सव विविध कार्यक्रमानी संपन्न होणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

करेल गावी दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंती उत्सव विविध कार्यक्रमानी संपन्न होणार

राजापूर – चव्हाणवाडी(श्री मनोहर धुरी)  – राजापूर तालुक्यातील करेल गावात ग्रामस्थ मंडळ आणि दत्त जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंतीनिमिताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सकाळी 8 वाजता श्री दत्तगुरुंच्या प्रतिमेचे पूजन व सत्यनारायण महापूजा मंत्राघोष नामजप आरती हे धार्मिक विधीचे कार्यक्रम होतील दुपारी 12 वा ते दुपारी 3 वा महाप्रसाद दुपारी 3 वा ते 4 वा हळदीकुंकू 4 वा ते 5 वा गावातील सांस्कृतिक कार्यक्रम व विविध खेळ संध्याकाळी 5 वा ते 6 वा धुपाराती आणि स्थानिक भजन तसेच रात्रौ 10 भाविकांच्या करमणुकीसाठी श्री वाघजाई नाट्य नमन मंडळ ओझर खुर्द संगमेश्वर यांचा नमन कार्यक्रम होईल यात नटखट गौळण पौराणिक गण पेंद्या सुदाम यांची करामत मावशीच्या धमाल अदाकारी आणि सामाजिक वग नाट्य झुंज हे सादर केले जाणार आहे तरी सर्वांनी या उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]