अनारी गावात लोकसहभागातून वनराई बंधारा साकार…

अनारी गावात लोकसहभागातून वनराई बंधारा साकार…

तळवली (मंगेश जाधव)….

अनारी आणि सावर्डे गावच्या सीमेवरील डोंगरातून उगम झालेल्या नदीवर अनारी हनुमान वाडी या ठिकाणी दिनांक 08 डिसेंबर 2024 या दिवशी लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. अनारी गावच्या पायथ्याशी अडरे धरण असून अनारी गावाला पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. गावात श्रीमंत योगी प्रतिष्ठान गेली 02 वर्षे सामाजिक कार्य करत आहे. या प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या समस्येकडे लक्ष देऊन पाणी अडवा पाणी जिरवा या उद्देशासाठी गावच्या नदीवर बंधारा बांधण्याचे ठरवले आणि लोकसहभागाची चळवळ सुरू झाली. गावच्या whatsaap ग्रुप वर बंधारा बांधण्याचे नियोजन सुरू झाले आणि दिवस ठरवला. आपल्या गावात पाणी समस्या आहे ती दूर करण्यासाठी माझाही हातभार लागला पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला गेलेले तरुण सुट्टी घेऊन गावाला आले गावच्या ग्रामस्थांना हातभार लावून श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.

जवळपास 10 mtr रुंद , 50 mtr लांब आणि 1 mtr असलेल्या भागात वनराई बंधाऱ्यात 5,00,000 ltr पाणी साठून रहाण्यास मदत झाली आहे. या गावात नदीच्या काठावर 15 ते 20 बोअरवेल पाडण्यात आले आहेत या बोअरवेलची भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. ज्या ठिकाणी बंधारा बांधला गेला आहे त्या ठिकाणी आजूबाजूला शेतजमीन लागवडीखाली कशी येईल या विषयी मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात गावच्या नदीचा सर्व्हे करून नदीवर Gabion सारखे साखळी बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले तर नदिमधील पाण्याची उपलब्धता ही हळू हळू वाढत जाऊन 5 ते 6 वर्षात बरमाई पाण्याची व्यवस्था होण्यास मदत होईल या विषयी माहिती देण्यात आली. या गावचा लोकसहभाग बघता या गावात वेगवेगळ्या विषयात काम करून गावचा शाश्वत विकास निश्चित होऊ शकतो याविषयी प्रेरणा देण्यात आली. ग्रामस्थांच्या लोकसहभाग चळवळीत TWJ फाउंडेशन, स्पर्श फाउंडेशन आणि Earth फाउंडेशन सहकार्यासाठी आले आणि लोकसहभाग चळवळ बळकट करून ग्रामस्थांना आधार दिला.

????Plz आमच्या RV News या YouTube चॅनल वर वरील बातमी पहा आणि subscribe करा ????????

https://youtu.be/M7HAfX1jHkU?si=QQ91rTx_tXS8Pgq5

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें