मंडणगड तालुका संघर्ष समिती आक्रमक

मंडणगड तालुका संघर्ष समिती आक्रमक

 

तळवली(मंगेश जाधव)….

मंडणगड तालुका संघर्ष समितीने १५ ऑगस्ट २०२४ रोजी राजेवाडी ते आंबडवे रस्त्याचे काम सुस्थितीत व्हावे त्यासाठी १५ ऑगस्टला अमरण उपोषण करण्यात आले होते.परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे तहसीलदारांना १२ डिसेंबर २०२४ रोजी निवेदन देऊन रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे की, मायानिंगच्या वाहतुकीमुळे बाजार पेठेमध्ये मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होत आहे. रस्त्याने प्रवास करत असताना छोट्या आणि मोठ्या वाहनांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्यांमुळे चालू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याला तडे जात आहेत. या करिता संघर्ष समितीने मायनिंगच्या गाड्या बंद करण्याची मागणी केली आहे. असे न झाल्यास २५ डिसेंबरला हजारोंच्या संख्येने जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येलवे यांनी दिला आहे .

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें