०५ जानेवारी रोजी खोडदे येथे प्रमोद नेटके यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

०५ जानेवारी रोजी खोडदे येथे प्रमोद नेटके यांच्या सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) 

गुहागर तालुक्यातील आबलोली गावचे सुपूत्र आणि पदवीधर शिक्षक श्री. प्रमोद राजाराम नेटके हे दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी नियत वयोमानानुसार जिल्हा परिषद शाळा मळण, तालुका गुहागर येथून पदवीधर शिक्षक सेवेतून सेवानिवृत्त झाले असून त्यांचा रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता “सेवानिवृत्ती समारंभाचे” आयोजन करण्यात आले आहे. या सेवानिवृत्ती समारंभाचे अध्यक्षस्थान माजी सभापती, शिक्षण महर्षी श्री. चंद्रकांतशेठ बाईत उर्फ आबा बाईत हे भूषविणार आहेत. या निमित्ताने रविवार दिनांक ०५ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०१:०० या वेळेत सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ०१:०० ते ०३:०० या वेळेत प्रगती भोजन आयोजित करण्यात आले असून हा संपूर्ण कार्यक्रम यशदा मंगल कार्यालय खोडदे, तालुका गुहागर येथे संपन्न होणार असून या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन सेवानिवृत्ती गौरव सोहळा समिती आणि विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ व महिला मंडळ आबलोली आणि नेटके परिवाराने केले आहे या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली – खोडदे पंचक्रोशीतील जनतेने वेळेत उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन सौ. प्रिया प्रमोद नेटके, कु. अजिंक्य प्रमोद नेटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]