शासकीय रेखाकला परीक्षेत तळवली हायस्कूलचे सुयश….!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शासकीय रेखाकला परीक्षेत तळवली हायस्कूलचे सुयश….!

तळवली (मंगेश जाधव)

पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली ता.गुहागर जि. रत्नागिरी या प्रशालेतील एकुण 50 विद्यार्थ्यांनी शासकीय रेखाकला परीक्षेत सुयश संपादन केल्याबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शासकीय रेखाकला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात एलिमेंट्री परीक्षेस -29 विद्यार्थी तर इंटरमिजिएट परीक्षेस -21विद्यार्थी असे एकुण 50 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाले होते.त्यापैकी इंटरमिजिएट परीक्षेत…ए ग्रेड -5, बी ग्रेड -8, सी ग्रेड -8 असे एकुण – 21 विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले, तर एलिमेंट्री परीक्षेत ए ग्रेड-1, बी ग्रेड-9, सी ग्रेड-18 विद्यार्थी असे एकुण -28 विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले.

या परीक्षेत सुयश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशालेचे कला शिक्षक श्री.श्रीनाथ कुळे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.शासकीय रेखाकला परीक्षेत प्रत्येक वर्षी या प्रशालेचे विद्यार्थी सुयश संपादन करतात. त्याप्रमाणे या वर्षीही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. एम. ए. थरकार सर यांनी श्री.कुळे सर व सुयश प्राप्त विद्यार्थ्यांंचे प्रशालेतील सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Mangesh Jadhav
Author: Mangesh Jadhav

मंगेश जाधव - तळवली रत्नागिरी वार्ताहर - डिजिटल मिडिया प्रतिनिधी.

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]