धक्कादायक ! पोलिस कॉन्स्टेबल मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या..

धक्कादायक ! पोलिस कॉन्स्टेबल मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या…

पोलीस हवालदाराच्या मुलाची आत्महत्या; वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर झाडल्या गोळ्या

मुंबई– गेल्या काही दिवसांपासून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्यातच आता मुंबई पोलीस दलातील एका हवालदारच्या मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे या मुलाचे नाव असून तो 20 वर्षांचा होता. हर्षने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोअर परेल परिसरातील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई पोलीस हवालदाराच्या मुलाने आत्महत्या केल्याचे घटना समोर आली आहे. हर्ष म्हस्के असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने वडिलांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.

 

हर्षचे वडील पोलीस हवालदार संतोष म्हस्के हे SP युनिटमध्ये मुंबई पोलीस दलात हवालदार म्हणून काम करतात. संतोष म्हस्के यांच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून हर्षने स्वत:च्या डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. संतोष म्हस्के हे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडे काही काळ बंदोबस्तासाठी त्यांच्या युनिटमध्ये तैनात होते, अशी माहिती समोर येत आहे. सध्या मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक हे त्यांच्या घरी पोहोचले आहे. ते या घटनेची माहिती घेत आहेत. मात्र २० वर्षीय हर्ष म्हस्केने आत्महत्या का केली, हे समजू शकलेले नाही.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें