संगमेश्वर रेल्वे स्थानकावर तीन गाड्याना थांबा मिळावा या मागणी साठी  रेल्वे स्थानकावरील आज उपोषण…

संगमेश्वर रेल्वे स्थानकावर तीन गाड्याना थांबा मिळावा या मागणी साठी  रेल्वे स्थानकावरील आज उपोषण…

???? संगमेश्वर रेल्वस्थानक ला ३ गाड्यांना थांबा मिळावा 

संगमेश्वर (वार्ताहर)- संगमेश्वर रेल्वे स्थानकावर तीन गाड्याना थांबा मिळावा अशी मागणी करूनही त्याला वाटण्याच्या अक्षता लावणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे धोरणाविरोधात आज निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या ग्रुप तर्फे लक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. 

 

गेले अनेक महिने केवळ आश्वासन देणाऱ्या कोकण रेल्वे प्रशासनाच्या विरोधात संगमेश्वर तालुक्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

याचाच एक भाग म्हणून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर या संगमेश्वर वासियांना सुविधा मिळण्यासाठी संघर्ष करणाऱ्या संस्थेने उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. लक्षणिक उपोषण करून लोकशाही मार्गाने कोकण रेल्वे प्रशासनाला इशारा देणार आहेत. या उपोषणानंतरही थांबे न मिळाल्यास संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें